मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashish Shelar Vs Ambadas Danve Tweet War : भाजपा नेते आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये ट्विटर वॉर

"यांना भ्रष्टाचाराचा भस्म्या झाला या!,"… अंबादास दानवे यांच्याकडून प्रत्युत्तर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ashish Shelar Vs Ambadas Danve Tweet War : भाजपा नेते आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये ट्विटर वॉर

"यांना भ्रष्टाचाराचा भस्म्या झाला या!,"… अंबादास दानवे यांच्याकडून प्रत्युत्तर

मुंबई :- भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी काही दिवसांपासून ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांवर कविता च्या माध्यमातून ट्विट करून टीका करत आहे. आशिष शेलार यांच्या टीकेला आता ठाकरे गटाकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कविताच्या माध्यमातूनच ट्विट करत टीका केली आहे.

आशिष शेलार यांचे ट्विट

यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया !

डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया ?.."हाता"ला धरलंया म्हणिते गणित ठरलंया‌…यांना भरलंया न्यारं पिसं, …हे पाही ना रातंदिस..सोळा करुन गोळा बसं…कोण तुतारी घेऊन येतं…कोण मशाल पेटवून असं…मोदी-मोदी करीत बसलंया.."घमेंडिया" मध्ये फसलंया..हाता"ला धरलंया म्हणिते आमचं गणित ठरलंया?..मन नाही यांच स्थिर,..यांना राहिला ना धीर..जागांची किरकिर..हरण्याची घाई फार…मोदींच्या भीतीनं घेरलंया यांना भीतीनं घेरलयां…..हाताला धरलंया म्हणिते गणित ठरलंया !..डोकं फिरलंया, आघाडीचं डोकं फिरलंया ? ( लोककवी मधुकर घुसळे यांची क्षमा मागून)

अंबादास दानवे यांचे प्रत्युत्तर

यांना भ्रष्टाचाराचा भस्म्या झाला या!

भस्म्या झाला भाजपला भस्म्या झाला या,…खोटे बोलतीये, कचरा गोळा करती या.. हे पाही ना रात्रंदिस, ..मोदी-मोदी पूजत बसं.. सारे भ्रष्टाचारी घेऊन कसं.. वॉशिंग मशीनमधून काढी असं..
खोटी गॅरेंटी देत बसलया.. खोटे बोलतीये, कचरा गोळा करती या.. मणिपूर म्हणती आमचेच घरं..
तिथे जायला हिंमत नाही बरं..
महाराष्ट्रात विरोधात वारं फिरं..
हे हिमालयात जाणार बरं.. जनता उत्तर मागते या.. प्रचारक हकालती या.. ईडीचं बाहुलं केलं या.. म्हणी भाजपमध्ये या..

हेही वाचा: Arvind Kejriwal : ईडीच्या अटके विरोधात याचिका दाखल,अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

शेअर करा