मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashish Shelar : "पहलगामची तुलना मुंबईशी? शेलारांच्या वक्तव्यावरून खळबळ उडाली!"

Ashish Shelar Compare Mumbai With Pahalmgam : “मराठी अस्मिता आणि दहशतवाद एकत्र कसे?” – काँग्रेस-शिवसेनेचा रोष

V
Vivek

1 मिनिट वाचन

BJP Leader Ashish Shelar Target MVA

Ashish Shelar Compare Mumbai With Pahalmgam : “मराठी अस्मिता आणि दहशतवाद एकत्र कसे?” – काँग्रेस-शिवसेनेचा रोष

मुंबई | “पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हिंदूंना धर्म विचारून मारलं आणि मुंबई मनसे कार्यकर्ते भाषा विचारून अमराठींना मारत आहेत” – सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवली आहे.

मनसेसह काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी शेलारांवर टीकेची झोड उठवत, त्यांच्या वक्तव्याला "धोरणशून्य आणि अपमानजनक" ठरवलं आहे.

मनसेचे अविनाश जाधव म्हणाले, “मराठीबद्दल चुकीचं बोलाल, तर गाठ मराठ्यांशीच आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर मराठी बोलावंच लागेल.”

शेलारांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, “मराठी आंदोलनाच्या आडून काही पक्ष ‘भीती पसरवा आणि मते मिळवा’ ही इंग्रजांची रणनीती वापरत आहेत. दोन कुटुंबं एकत्र आली, यात आनंद आहे, पण त्याच्या नावाखाली अनुचित वर्तन चालणार नाही.” त्यांनी यावेळी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या भाषणांनाही टोकाचं अप्रासंगिक ठरवत, संपूर्ण मेळाव्याला "अवास्तव" म्हटलं.

या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला – “दोन बंधू भेटले म्हणून शेलारांना पहलगाम आठवावं, हे दुर्दैवी आहे. पाकिस्तानात शंभर अतिरेकी मारल्याचा दावा करता, पण पहलगामचे दहशतवादी आजही मोकाट आहेत!”
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ताशेरे ओढत म्हटलं – “राज्यात शिंदे-फडणवीसांनी आता 'रडण्याचा कार्यक्रम' जाहीरपणे सुरू करावा.”

शेअर करा