मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ashadhi wari 2026 : आळंदी जलमय, वारकऱ्यांसाठी PMC कडून पाणीकपात तात्काळ मागे

Ashadhi wari 2026 : पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी आणि देहू परिसरात अत्यंत गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

DO
Dhanshree Otari

3 मिनिट वाचन

ashadhi wari 2026

Ashadhi wari 2026 : मुख्यमंत्र्यांचा वारकऱ्यांना थेट पुण्यात येण्याचा इशारा

Ashadhi wari 2026 : पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी आणि देहू परिसरात अत्यंत गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पवित्र इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून आळंदीतील तब्बल चारही प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. या अभूतपूर्व नैसर्गिक संकटामुळे आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल करावा लागला असून, देहू-आळंदीत मुक्कामी असणारे लाखो वारकरी आता दोन दिवस आधीच पुण्यात दाखल होणार आहेत.(ashadhi wari 2026 water cut canceled)

या आपत्कालीन परिस्थितीची गंभीर दखल घेत पुणे महानगरपालिकेने शहरात लागू केलेली पाणीकपात आज रात्री १२ वाजल्यापासून ते आगामी १२ जुलैपर्यंत पूर्णपणे मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण आणि तातडीचा निर्णय घेतला आहे. लाखो वारकऱ्यांची पुण्यात गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने ही युद्धपातळीवर पावले उचलली आहेत.

मुख्यमंत्र्यांचे वारकऱ्यांना थेट पुण्यात येण्याचे आवाहन
आषाढी वारी सोहळा सुरू असतानाच दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. आळंदी आणि देहू येथील सर्व महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले असून तिथे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. नियोजित वेळापत्रकानुसार आळंदी-देहूवरून निघालेल्या पालख्या १० जुलै रोजी पुण्यात पोहोचतात. (ashadhi wari 2026 water cut canceled)

पालख्या सुरक्षितपणे पुण्यात आणण्याची पूर्ण जबाबदारी शासनाची आहे. परंतु, आमची वारकरी बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की, त्यांनी आता देहू किंवा आळंदीमध्ये गर्दी न करता थेट पुणे शहराकडे प्रस्थान करावे. तिथे जमा होणे सध्या अत्यंत धोक्याचे आहे. (Ashadhi wari 2026 )

हेही वाचा: Rain Updates : खडकवासला धरणातून पुढील २४ तासांत विसर्ग शक्य; सतर्कतेचा इशारा

वारकऱ्यांच्या निवासासाठी शासनाने पुण्यात जर्मन हँगर्सच्या (अत्याधुनिक वॉटरप्रूफ तात्पुरते मंडप) माध्यमातून चोख व्यवस्था केली आहे. कुठेही कोणालाही त्रास होणार नाही, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ashadhi wari 2026
राज्यातील या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा हाय अलर्टवर आहे. मंत्रालयातील मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत करण्यात आला असून, या विभागाचे सचिव आणि त्यांची संपूर्ण टीम प्रत्येक जिल्ह्याच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या थेट संपर्कात आहे. अगदी गाव पातळीपर्यंत हवामानाचे आणि पुराचे अलर्ट वेळेत पोहोचवले जात आहेत. मुंबईत बीएमसी (BMC) नियंत्रण कक्षही याच पद्धतीने कार्यरत आहे. (Ashadhi wari 2026 )

मुख्यमंत्र्यांनी वारीतील भाविकांसह सामान्य नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. "पुढील काही तास अत्यंत वेगवान वारे आणि मुसळधार पावसाचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळावा. अत्यंत अत्यावश्यक काम असेल तरच रस्त्यावर उतरावे, अन्यथा सुरक्षित स्थानी राहावे," असे आवाहन त्यांनी केले आहे. (Ashadhi wari 2026 )

Pimpri Chinchwad Rain : पूरबाधित १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

वारकऱ्यांच्या सेवेसाठी महापालिका प्रशासनाची तत्परता; पाणीकपात तूर्तास स्थगित
धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने जरी हा पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला असला, तरी गेल्या २४ तासांत निसर्गाने घेतलेल्या पलटीमुळे प्रशासनाला आपले नियोजन बदलावे लागले आहे. आळंदीत पूर आल्याने लाखो वारकरी दोन दिवस आधीच पुण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत जर शहरात पाणीकपात लागू राहिली, तर वारकऱ्यांचे अतोनात हाल झाले असते आणि आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला असता.

Missing Link : ‘मिसिंग लिंक’ की ‘भ्रष्टाचाराची लिंक’? पहिल्याच पावसात प्रकल्पाचे पितळ उघडे!

लाखो भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्तांनी तातडीने बैठक घेऊन आज रात्री १२ वाजेपासून थेट १२ जुलैपर्यंत ही पाणीकपात पूर्णपणे स्थगित केली आहे. वारी काळात पुणेकरांना आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना पुरेसा पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन महापालिकेने दिले आहे. पूर परिस्थिती आणि वारीच्या स्वागतासाठी पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि महापालिकेची यंत्रणा सध्या युद्धपातळीवर तैनात आहे. (Ashadhi wari 2026 )

शेअर करा