मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : क्टिव सिटिझन काऊन्सिल व सेक्टर 34 येथिल सोसायटी माध्यमातून दिवाळी सन्मानाची माझ्या कर्मचारी बांधवांची स्तुत्य उपक्रम

पनवेल : कामोठे शहरांतील, दिवाळी निमित्त सेक्टर 34 येथे क्टिव सिटिझन काऊन्सिल व सेक्टर 34 येथिल सोसायटी यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या शहरातील सर्व स्वच्छता दूत, आरोग्य कर्मचारी, धूर फवारणी व ईतर सर्व कर्मचारी बांधव यांना दिवाळी भेट वस्तू तसेच दिवाळी फराळ , मिठाई वाटप करुन देश हिताचा, सर्व

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News

पनवेल : कामोठे शहरांतील, दिवाळी निमित्त सेक्टर 34 येथे क्टिव सिटिझन काऊन्सिल व सेक्टर 34 येथिल सोसायटी यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या शहरातील सर्व स्वच्छता दूत, आरोग्य कर्मचारी, धूर फवारणी व ईतर सर्व कर्मचारी बांधव यांना दिवाळी भेट वस्तू तसेच दिवाळी फराळ , मिठाई वाटप करुन देश हिताचा, सर्वांच्या एकीचा,बांधिलकी जपण्याचा संदेश यातून दिला.

शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी, महानगरपालिका व लोकप्रतिनिधी म्हणून हे सर्वजण नेहमी तत्पर व सज्ज आहोत असा विश्‍वास यावेळी व्यक्त केला. यावेळी उपक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यसम्राट मा.नगरसेवक विकास घरत, डॉ. सखाराम गारळे, युवा मोर्चा उपाध्यक्ष .राहुल बुधे, आदित्य भगत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना मगदूम कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र पाधी, विजय सरगर, सुशांत काटकर, भूषण यादव, चंद्रकांत यादव, चंद्रकांत खोसे व सर्व सोसायटींच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: गरीब गरजू लोकांना फराळ वाटून रिद्धी कॉम्प्युटर इंस्टिट्यूटने साजरा केला दिवाळी सण

शेअर करा