मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : अण्णा हजारेंची प्रकृती स्थिर; ताप-खोकल्यामुळे रुग्णालयात दाखल

Pune News : अहिल्यानगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आलं आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

अण्णा हजारेंची प्रकृती स्थिर; ताप-खोकल्यामुळे रुग्णालयात दाखल
अण्णा हजारेंची प्रकृती स्थिर; ताप-खोकल्यामुळे रुग्णालयात दाखल

Pune News : अहिल्यानगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली असून, डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अण्णा हजारे यांना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा त्रास जाणवत होता. उपचार सुरू असूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.https://maharashtramirror.com/ Pune News
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून, अहवालांच्या आधारे पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे. अण्णांची प्रकृती बिघडली असली तरी सध्या ती स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अण्णांचे वय आणि प्रकृतीतील अशक्तपणा लक्षात घेता डॉक्टरांनी खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवले आहे. अण्णांच्या प्रकृतीची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि अनुयायांमध्ये चिंता निर्माण झाली असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही अण्ण हजारे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. "ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बरी नसल्याचं वृत्त काळजी करण्यासारखं आहे. अण्णा तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा. आमच्या सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत," असं रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शेअर करा