मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Anjali Damania On Ajit Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा अजित पवारांवर नवा 'बॉम्ब'! 500 कोटींचे शताब्दी रुग्णालय नातेवाईकांच्या घशात? फडणवीसांवरही संताप

•'पीपीपी' तत्त्वाने 580 बेडचे हॉस्पिटल राणा पाटलांच्या ट्रस्टला देण्याचा घाट; 'अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घाला': दमानियांची थेट मुख्यमंत्र्यांना टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Anjali Damania On Ajit Pawar : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा अजित पवारांवर नवा 'बॉम्ब'! 500 कोटींचे शताब्दी रुग्णालय नातेवाईकांच्या घशात? फडणवीसांवरही संताप

•'पीपीपी' तत्त्वाने 580 बेडचे हॉस्पिटल राणा पाटलांच्या ट्रस्टला देण्याचा घाट; 'अख्खा महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घाला': दमानियांची थेट मुख्यमंत्र्यांना टीका

मुंबई :- पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. मुंबई महानगरपालिकेने 500 कोटी खर्च करून उभारलेले गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय आता अजित पवारांच्या नातेवाईकांच्या ट्रस्टला 'पीपीपी' तत्त्वावर चालवण्यासाठी दिले जात असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी एक्स (X) वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. 580 बेडचे हे भव्य रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वाने चालवण्यासाठी देण्याचा घाट घातला गेला आणि योगायोगाने यात पद्मसिंह पाटील (जे अजित पवारांच्या पत्नी, खासदार सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत) यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने बोली लावली आहे. या ट्रस्टचा कारभार आमदार राणा जगजीतसिंह पाटील (अजित पवारांचे पुतणे) पाहतात.

"आता आणखी एक 500 कोटी रुपयांचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना?" असा संतप्त सवाल दमानिया यांनी केला आहे. त्यांनी केवळ अजित पवारांवरच नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले आहे. "मुख्यमंत्री फडणवीसची, तुम्ही एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा," अशा तिखट शब्दांत दमानिया यांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

राज्यात तयार रुग्णालये 'पीपीपी' मॉडेलच्या नावाखाली एकाच राजकीय कुटुंबाच्या हाती सोपवण्याच्या कथित प्रयत्नांवरून हा वाद आता चांगलाच पेटला आहे.

हेही वाचा: Balasaheb Thackeray Death Anniversary : 11 वर्षांनंतर भावनिक क्षण! बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी उद्धव-राज ठाकरे स्मृतीस्थळावर एकत्र

शेअर करा