मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Anjali Damania : अजित पवारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वाद; “उपमुख्यमंत्र्यांना हे शोभते का?”, अंजली दमानियांचा सवाल

• Anjali Damania On Ajit Pawar माढ्यात अवैध उत्खननावरील कारवाईवरून फोनवर संतापले अजित पवार; थेट फोन कॉलवर महिला अधिकाऱ्याला दम

V
Vivek

1 मिनिट वाचन

Anjali Damania : अजित पवारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वाद; “उपमुख्यमंत्र्यांना हे शोभते का?”, अंजली दमानियांचा सवाल

•Anjali Damania On Ajit Pawar माढ्यात अवैध उत्खननावरील कारवाईवरून फोनवर संतापले अजित पवार; थेट फोन कॉलवर महिला अधिकाऱ्याला दम

पुणे :- सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे अवैध उत्खननावर कारवाई करणाऱ्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्यास सांगितल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नवा वाद निर्माण झाला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर कठोर टीका केली आहे.

व्हिडिओमध्ये, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या फोनवरून बोलताना अजित पवार त्या महिला अधिकाऱ्याला म्हणाले, “मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतोय. मी तुम्हाला कारवाई थांबवण्याचे आदेश देतो. तहसीलदारांना सांगा की, अजित पवार यांचा फोन आला होता. मला उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई थांबवण्यास सांगितले आहे.”

यावर त्या महिला अधिकाऱ्याने थेटपणाने उत्तर दिले, “सर, तुम्ही थेट माझ्या फोनवर कॉल करा ना.” अधिकाऱ्याच्या या मागणीमुळे अजित पवार संतापले आणि त्यांनी, “मी तुमच्यावर कारवाई करीन. तुम्ही मला सांगत आहात की, थेट कॉल करा. तुमचा नंबर द्या मी कॉल करतो,” असे म्हटले.

‘एका उपमुख्यमंत्र्यांना हे शोभतं का?’

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून टीका केली आहे. "महिला अधिकारी आपले काम करत होत्या, तर इतरांच्या सांगण्यावरून, त्यांना कॉल करून धमकी देणे एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का?" असा सवाल त्यांनी केला.

दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, "'तुझे डेरिंग कसे झाले' असे त्या बाईंना अजित पवार म्हणाले? इतकी दादागिरी? याबद्दल अजित पवारांनी त्या महिलेची माफी मागितली पाहिजे."

हेही वाचा: Monsoon Update : आजपासून शहरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी

शेअर करा