मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

अनिल परब यांचा योगेश कदमांवर भडका! – सावली बार ते वाळू घोटाळा, पेन ड्राइव्हसह फडणवीसांकडे पुरावे सादर करणार

•Anil Parab On Yogesh Kadam : जगबुडी नदीतील वाळूचा थेट 'योगिता डेंटल कॉलेज'पर्यंत प्रवास; ड्रोन कॅमेऱ्यात कैद – परबांचा दावा

V
Vivek

1 मिनिट वाचन

अनिल परब यांचा योगेश कदमांवर भडका! – सावली बार ते वाळू घोटाळा, पेन ड्राइव्हसह फडणवीसांकडे पुरावे सादर करणार

•Anil Parab On Yogesh Kadam : जगबुडी नदीतील वाळूचा थेट 'योगिता डेंटल कॉलेज'पर्यंत प्रवास; ड्रोन कॅमेऱ्यात कैद – परबांचा दावा

मुंबई :- शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी थेट शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. पत्रकार परिषद घेऊन परब यांनी सावली बारमधील कथित अश्लील नृत्यांपासून ते रत्नागिरीतील वाळू घोटाळ्यापर्यंतचे पुरावे सादर करत भाजप व शिंदे गटाच्या गोटात खळबळ उडवली आहे.

ड्रोनमधून चित्रीकरण, पुरावे पेन ड्राइव्हमध्ये

परब म्हणाले की, "जगबुडी नदीत गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू उपसा सुरू असून ती वाळू थेट योगेश कदम यांच्या बहिणीच्या 'योगिता डेंटल कॉलेज'च्या आवारात साठवली जात आहे." याचा संपूर्ण ड्रोन कॅमेऱ्यात चित्रीत व्हिडिओ आणि फोटो असल्याचा दावा करत त्यांनी सर्व पुरावे पेन ड्राइव्हमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या सादर करण्याचे जाहीर केले.

“योगेश कदम यांच्या घरात काम करणाऱ्याचं नाव घोटाळ्यात”

परब यांनी सांगितले की, "महादेव नाल्यातील गाळ काढायचा होता, पण प्रत्यक्षात सावित्री नदीतून वाळू उपसली जात होती. हे काम 'अकील मुकादम' नावाचा माणूस करतो, जो योगेश कदम यांच्या घरातच काम करतो," असा आरोप त्यांनी केला. लक्षवेधी झाल्यावर गाळ उपसा बंद करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

सावली बारमध्ये बारबालांचा ठेका? – परबांचा दावा

“सावली बार योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असून, तेथे बारबाला, अश्लील नृत्य, आणि पैसे उडवण्याचे प्रकार घडले,” असा खळबळजनक आरोप करत परब म्हणाले की, "एफआयआर व पोलिसांची नोंद माझ्याकडे माहितीच्या अधिकारातून मिळाली आहे. 22 बारबाला, 22 ग्राहक व चार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याचा दाखला पोलिस नोंदवहीत आहे."

योगेश कदम यांनी परब यांना ‘अर्धवट वकील’ म्हटले होते, यावर परब यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली –
"मी विधानसभेत आमदार म्हणून बोलतो. ही माझी चौथी टर्म आहे. मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही."

"राजीनामा घ्या अन्यथा कोर्टात जाईन, हिम्मत असेल तर माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा करा," असा थेट इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा: Mahajan Vs Khadse : महाजन विरुद्ध खडसे – मुलाच्या मृत्यूवरून वाद शिगेला! CBI चौकशीची मागणी, मालमत्तेवरही प्रश्न

शेअर करा