मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Analogue Cheese Seized : मुंबईत पनीर म्हणून विक्री होणारा बनावट चीझ अ‍ॅनालॉग जप्त; गुन्हे शाखेची छापा कारवाई

मुंबई, २५ ऑगस्ट: - मुंबईत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत, सी.बी.

V
Vivek

2 मिनिट वाचन

Analogue Cheese Seized : मुंबईत पनीर म्हणून विक्री होणारा बनावट चीझ अ‍ॅनालॉग जप्त; गुन्हे शाखेची छापा कारवाई

मुंबई, २५ ऑगस्ट:- मुंबईत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत, सी.बी. कंट्रोल गुन्हे शाखेने अँन्टॅाप हिल परिसरात धाड टाकली. या कारवाईत तब्बल ५५० किलो चीझ अ‍ॅनालॉग पदार्थ पनीर म्हणून विक्रीसाठी ठेवलेला जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह ही छापेमारी केली. "ओम कोल्ड्रीक हाऊस" आणि "श्री गणेश डेअरी" या दोन दुकानांत तसेच दुकानाबाहेरील सुझुकी सुपर कॅरी या टेम्पोत संशयास्पद स्वरूपात साठवलेले पनीरसदृश पदार्थ सापडले. तपासात तो पदार्थ चीझ अ‍ॅनालॉग असल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे चीझ अ‍ॅनालॉग ?

Food Safety & Standards Authority of India (FSSAI) नुसार, जे पदार्थ खऱ्या चीजशिवाय बनवलेले असतात आणि चीजसारखे दिसतात, त्यावर "Cheese Analogue" असे स्पष्ट लेबल असणे आवश्यक आहे. परंतु, कारवाईत आढळलेले पनीरसदृश पदार्थ हे लेबलविरहित होते.

चीझ अ‍ॅनालॉग हा पदार्थ दुधाऐवजी दुधाची पावडर, हलक्या प्रतीचे पाम तेल व रासायनिक घटक वापरून तयार केला जातो. तो दिसायला पनीरासारखा असला तरी पोषणमूल्य कमी असल्याने आरोग्यास अपायकारक ठरतो. खरी मलईयुक्त पनीरात प्रथिने, कॅल्शियम व निरोगी चरबी असते; मात्र या पदार्थात ते घटक अल्प प्रमाणात आढळतात.

नागरिकांना व व्यापाऱ्यांना आवाहन

मुंबई पोलिसांनी नागरिकांना सूचित केले आहे की –

पनीर व दुग्धजन्य पदार्थ फक्त विश्वासार्ह दुकानातून व लेबल तपासून खरेदी करावेत. सैल किंवा लेबलविरहित पदार्थ खरेदी टाळावेत. खरे पनीर दाणेदार पोताचे व नैसर्गिक दुधाच्या वासाचे असते, तर बनावट पनीर मेणासारखे व सपाट लागते. भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्यास अन्नविषबाधा व गंभीर आरोग्य धोके संभवतात.

संशयास्पद विक्री अथवा साठा आढळल्यास त्वरित १०० क्रमांकावर माहिती द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. व्यापाऱ्यांना कडक इशारा देत पोलिसांनी सांगितले आहे की, भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही कारवाई पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन व पोलीस उपायुक्त (प्रतिबंधक) कजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यात प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते, स.पो.नि. रोहन बगाडे, स.पो.नि. महेश सांगळे, पोउपनि. नंदकिशोर बोरोले, म.फी. प्रकाश आव्हाड, पो.ह. गणेश डोईफोडे, म.पो.ह. रिचा मोवेकर, पो.शि. संदीप वावळ, म.पो.शि. अर्चना कासारकर व पो.शि. आकाश पवार यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा: Manoj Jarange Patil : ‘आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा’; मनोज जरांगे यांचा फडणवीसांना थेट इशारा

शेअर करा