Mumbai News : मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा
Mumbai News : मुंबई : मुंबई-पुणे दौऱ्यादरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
1 मिनिट वाचन

Mumbai News : अमित ठाकरेंवर सिद्धेश कदम यांची जहरी टीका
Mumbai News : मुंबई : मुंबई-पुणे दौऱ्यादरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपने मनसेविरोधात आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली. आता या वादात शिंदेसेनेनेही उडी घेतल्याने राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात प्लास्टिक रिसायकलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांनी अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.https://maharashtramirror.com/ Mumbai News
‘अमित ठाकरेंचे वर्तन बालिशपणाचे
अमित ठाकरे यांचे वर्तन म्हणजे बालिशपणा असल्याचे सिद्धेश कदम यांनी म्हटले. युवा पिढीला काय अपेक्षित आहे, हे समजून घेण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर निशाणा साधला.https://maharashtramirror.com/ Mumbai News
‘मोदी देशाचे पंतप्रधान आहेत
“अमित ठाकरे यांचे हे वर्तन म्हणजे बालिशपणा आहे. आजच्या युवा पिढीला काय पाहिजे, हे त्यांना कळत नाही. कुठेही आक्रमकता दाखवायची. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे देखील ते विसरले. जगाच्या नकाशावर मोदी साहेबांचे वर्चस्व आहे,” असे सिद्धेश कदम म्हणाले.
तसेच, “तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. तुम्ही भारतात कशाला राहता?” असा थेट सवालही त्यांनी अमित ठाकरे यांना केला.
दरम्यान, सिद्धेश कदम यांच्या या वक्तव्यामुळे मनसे-भाजप यांच्यात सुरू असलेल्या वादाला आता शिंदेसेनेच्या आक्रमक भूमिकेची फोडणी मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणावरून महायुतीतील घटक पक्ष आणि मनसे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




