मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : अमित ठाकरेंच्या फोटोप्रकरणावरून भाजप-मनसेत जुंपली

Mumbai News : मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या फोटोप्रकरणावरून भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोपांची रंगत चांगलीच वाढली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

अमित ठाकरेंच्या फोटोप्रकरणावरून भाजप-मनसेत जुंपली!
अमित ठाकरेंच्या फोटोप्रकरणावरून भाजप-मनसेत जुंपली!

Mumbai News : कृष्णराज महाडिकांच्या आरोपांना गजानन काळेंचे खोचक प्रत्युत्तर; ‘कोल्हापूरच्या हृतिक रोशनची फर्स्ट कॉपी’ म्हणत डिवचले

Mumbai News : मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या फोटोप्रकरणावरून भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोपांची रंगत चांगलीच वाढली आहे. प्राचार्यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोशेजारी लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितल्याचा आरोप अमित ठाकरे यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्याने हा फोटो भिंतीवरून काढल्याने वादाला तोंड फुटले. या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

या घटनेनंतर मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी भाजप युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, माहीममध्ये झालेल्या मनसे-भाजप संघर्षानंतर दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरूच आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी महाडिक यांच्यासह भाजयुमो कार्यकर्त्यांना माहीम परिसरातच ताब्यात घेतले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

‘मनसेच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली’

या आंदोलनावरून कृष्णराज महाडिक यांनी मनसे कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. “आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत होतो; मात्र मनसेचे गुंड आमच्या अंगावर धावून आले. आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. आमच्या मुलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावण्यात आल्या. पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले; मात्र मनसेच्या गुंडांना ताब्यात घेतले नाही. त्यांनाही ताब्यात घ्यावे,” अशी मागणी महाडिक यांनी केली.https://maharashtramirror.com/ Mumbai News

महाडिक यांच्या या आरोपांनंतर मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मनसे नेते गजानन काळे यांनी खोचक शब्दांत महाडिक यांच्यावर टीका केली. “कोल्हापूरच्या हृतिक रोशनची फर्स्ट कॉपी, तीही पायरेटेड… आंदोलन करतायेत ते पण तीन किलोमीटर लांब! ते आंदोलनही फसलं, मग हे आम्हाला चोर म्हणणार,” अशा शब्दांत काळे यांनी महाडिक यांना लक्ष्य केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

‘अमित ठाकरे प्रश्न सोडवतात, हे झोंबतंय का?’

गजानन काळे यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. “अमित ठाकरे जर कालचं पोरं असेल तर रविंद्र चव्हाण हा बनेल प्रवक्ता का बोलतोय? आंदोलन होतंय आणि रविंद्र चव्हाणांनाच त्याची माहिती नाही? अमित ठाकरे महाविद्यालयात जाऊन प्रश्न सोडवत आहेत, हे झोंबतंय का?” असा सवाल काळे यांनी उपस्थित केला.https://maharashtramirror.com/ Mumbai News

दरम्यान, फोटोप्रकरणापासून सुरू झालेला हा वाद आता रस्त्यावरच्या संघर्षापर्यंत पोहोचला आहे. भाजप आणि मनसेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

शेअर करा