मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ambernath Election Update : अंबरनाथ निवडणुकीत 'बोगस' मतदानाचा राडा! कोहोजगावमध्ये 200 हून अधिक महिलांची संशयास्पद गर्दी; भाजप-काँग्रेस आक्रमक

• भिवंडीहून आणले मतदार?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ambernath Election Update : अंबरनाथ निवडणुकीत 'बोगस' मतदानाचा राडा! कोहोजगावमध्ये 200 हून अधिक महिलांची संशयास्पद गर्दी; भाजप-काँग्रेस आक्रमक

•भिवंडीहून आणले मतदार? पोलिसांकडून सभागृह रिकामे; अंबरनाथमधील राजकीय वातावरण पेटले

अंबरनाथ | राज्यातील 23 नगरपरिषदांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असतानाच, अंबरनाथमध्ये लोकशाहीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. कोहोजगाव परिसरातील एका सभागृहात पहाटेच्या सुमारास शेकडो महिला आणि पुरुषांची गर्दी जमल्याचे उघड झाले असून, हे सर्वजण 'बोगस मतदान' करण्यासाठी आणलेले बाहेरचे लोक असल्याचा गंभीर आरोप भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

पहाटेचा 'तो' संशयास्पद मेळावा अन् गोंधळ!

मिळालेल्या माहितीनुसार, कोहोजगावमधील एका खाजगी सभागृहात पहाटेपासूनच लोकांची वर्दळ सुरू होती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. प्रतिस्पर्धी उमेदवाराने मतदान प्रक्रियेवर डल्ला मारण्यासाठी या महिलांना बाहेरून आणले असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

208 महिला आणि मुले; सर्वजण भिवंडीचे?

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सभागृहातील गर्दीला बाहेर काढले. प्राथमिक तपासाबाबत माहिती देताना अंबरनाथ पोलिसांनी सांगितले की, "सभागृहात एकूण 208 महिला आणि मुले आढळून आली आहेत. प्राथमिक चौकशीत हे सर्वजण भिवंडी परिसरातील रहिवासी असून ते स्थानिक मतदार नसल्याचे समोर आले आहे." हे लोक तिथे नेमके कशासाठी जमले होते आणि त्यांना कोणी आणले, याची खात्री-पडताळणी फिरत्या पथकामार्फत (Flying Squad) केली जात आहे.

हेही वाचा: Thane Scam : अय्याशी, भ्रष्टाचार आणि बनावट कागदपत्रांचा सडा! — लोढा माजिवड्यातील ८ कोटींच्या गाळ्यांचा गूढ व्यवहार उघडकीस

शेअर करा