मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dharashiv News : ऑपरेशन टायगर’ होणार नाही : अंबादास दानवे

Dharashiv News : धाराशिव : शिंदे सेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

‘ऑपरेशन टायगर’ होणार नाही : अंबादास दानवे
‘ऑपरेशन टायगर’ होणार नाही : अंबादास दानवे

Dharashiv News : ठाकरे गटाचे १४ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; दानवेंकडून कायदेशीर कारवाईचा इशारा


Dharashiv News : धाराशिव :
शिंदे सेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने सहा खासदार आपल्या गटात घेतल्यानंतर आता ठाकरे गटातील आमदारही फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या २० पैकी १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.https://maharashtramirror.com/ Dharashiv News
धाराशिव दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले, “कुणाची कितीही इच्छा असली तरी यावेळी ‘ऑपरेशन टायगर’ होणार नाही. खासदार फुटले त्यावेळी संख्येचे गणित वेगळे होते. मात्र, आता आमदारांच्या संख्येचे गणित वेगळे असून ते गाठता येणार नाही.”https://maharashtramirror.com/ Dharashiv News
ठाकरे गटातील आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्यास पक्षाकडून आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. पक्ष आता कारवाईच्या पवित्र्यात असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.https://maharashtramirror.com/ Dharashiv News
दरम्यान, शिंदे सेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी ठाकरे गटातील १४ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. हे आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असेही त्यांनी म्हटले होते.
आमदारांनंतर ठाकरे गटातील नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे संकेत मुरजी पटेल यांनी दिले होते. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेतील दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा