मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar : अजित पवारांच्या या वक्तव्यावर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्र्यांना दिलासा की धक्का?

• Ajit Pawar यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit Pawar

• Ajit Pawar यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. आता याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाकडून आला आहे. उपमुख्यमंत्र्यांना दिलासा की धक्का?

पुणे :- अजित पवार Ajit Pawar यांनी एका निवडणूक सभेत विकास निधीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली आहे. अजित पवार यांनी दिलेल्या निवेदनात उमेदवाराचे नाव नसल्याचे सांगून क्लीन चिट देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी याबाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांना सादर केला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवारांचे Ajit Pawar भाषण चर्चेत आहे. या भाषणांमध्ये अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधताना केलेली वक्तव्ये वादात सापडली आहेत. त्यावर विरोधकांनीही जोरदार टीका केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आचारसंहिता भंग प्रकरणी क्लीन चिट दिली आहे. त्याची प्रत राज्य निवडणूक आयोगालाही पाठवण्यात आली आहे.

निवडणूक आयोग काय म्हणाला?
बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या इंदापूर येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, विकासनिधी हवा असेल तर उमेदवाराच्या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबा. यानंतर कविता द्विवेदी यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. Ajit Pawar यांनी प्राथमिक चौकशीदरम्यान दिलेल्या निवेदनात त्यांच्याकडून कोणत्याही उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे कविता द्विवेदी यांनी सादर केलेल्या अहवालात हा आचारसंहितेचा भंग नसल्याचे म्हटले होते.

Ajit Pawar यांना विचारले असता अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाला तपास करण्याचा अधिकार आहे. येत्या निवडणुकीत मी महायुती धर्माचे पालन करणार असल्याचे अजित पवार यांनी बारामती येथील सभेतील भाषणात सांगितले

हेही वाचा: PM Modi's Request : तुमचे मत, तुमचा आवाज, मतदान रेकॉर्ड करा', दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींची जनतेला विनंती.

शेअर करा