मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ajit Pawar : कृषी मंत्री कोकाटेंना अजित पवारांची 'फटका'! राजीनाम्याची शक्यता वाढली

Ajit Pawar On Manikrao Kokate : रमी खेळण्यावरुन आणि 'सरकार भिकारी' वक्तव्यावरुन अजित पवार संतापले; 15 मिनिटांहून अधिक काळ चालली कानउघडणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ajit Pawar : कृषी मंत्री कोकाटेंना अजित पवारांची 'फटका'! राजीनाम्याची शक्यता वाढली

Ajit Pawar On Manikrao Kokate : रमी खेळण्यावरुन आणि 'सरकार भिकारी' वक्तव्यावरुन अजित पवार संतापले; 15 मिनिटांहून अधिक काळ चालली कानउघडणी

मुंबई :- महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जोरदार 'फटका' बसला. मंत्रालय स्थित अजित पवार Ajit Pawar यांच्या दालनात झालेल्या 15 मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत अजित पवारांनी कोकाटेंवर नाराजगी व्यक्त करत संयमाने बोलण्याचा सल्ला दिला आणि त्यांची चांगलीच कानउघडणी केली. या घटनेमुळे कोकाटेंच्या राजीनाम्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनादरम्यान, कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रमी गेम खेळताना दिसले होते. याशिवाय, त्यांनी सरकारबद्दल "सरकार भिकारी आहे" असे वादग्रस्त विधानही केले होते, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती आणि सरकारचीही कोंडी झाली होती.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत अजित पवारांनी कोकाटेंना स्पष्ट शब्दांत त्यांची चूक दाखवून दिली आणि भविष्यकाळात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची ताकीद दिली. कोकाटे यांनीही आपल्या चुकांबद्दल खेद व्यक्त करत, यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची ग्वाही अजित पवारांना दिली.

या महत्त्वपूर्ण भेटीनंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांच्या राजीनाम्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. तसेच, कृषी मंत्री म्हणून त्यांचा विभाग बदलला जाण्याचीही चर्चा सुरू आहे. सूत्रांनुसार, कृषी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधीलच मंत्री मकरंद पाटील यांना दिला जाऊ शकतो, तर त्यांच्याकडील राहत आणि पुनर्वसन विभाग कोकाटेंना दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर करा