मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

एअर इंडिया AI-171 अपघाताच्या चौकशीला गती : ब्लॅक बॉक्समधून मिळाल्या निर्णायक माहितीच्या धारा

• ब्लॅक बॉक्सचं मेमरी मॉड्यूल अखेर डिकोड; एएआयबी पथकाच्या तपासाला वेग

V
Vivek

1 मिनिट वाचन

एअर इंडिया AI-171 अपघाताच्या चौकशीला गती : ब्लॅक बॉक्समधून मिळाल्या निर्णायक माहितीच्या धारा

•ब्लॅक बॉक्सचं मेमरी मॉड्यूल अखेर डिकोड; एएआयबी पथकाच्या तपासाला वेग

ANI :- 12 जून रोजी दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया AI-171 या विमानाच्या अपघातामागील रहस्य उलगडण्याच्या दिशेने मोठा टप्पा पार करण्यात आला आहे. या दुर्घटनेतून सापडलेल्या ब्लॅक बॉक्समधील महत्त्वपूर्ण डेटा अखेर यशस्वीरित्या डिकोड करण्यात आला आहे, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली.

या अपघाताच्या तपासासाठी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने ब्लॅक बॉक्समधील क्रॅश प्रोटेक्शन मेमरी मॉड्यूल 25 जून रोजी डाऊनलोड केले. यामध्ये कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या माध्यमातून वैमानिकांचे संवाद, यंत्रणांची स्थिती, आणि शेवटच्या क्षणी झालेले तांत्रिक बदल टिपले गेले आहेत.

या विश्लेषणाच्या आधारे विमान कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड कारणीभूत होता की मानवी चूक, याचा अंतिम निर्णय घेता येणार आहे. एटीसी अधिकारी, वैमानिक वैद्यकीय तज्ज्ञ, आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या प्रतिनिधींचा तपास पथकात समावेश आहे.

सरकारच्या मते, या तपासाचा मुख्य उद्देश हवाई सुरक्षेतील त्रुटी ओळखून भविष्यातील अपघात टाळणे हा आहे. संबंधित ब्लॅक बॉक्सला काहीसे नुकसान झालं असतानाही त्यामधील डेटाची सुरक्षित पुनर्प्राप्ती ही तपासातली मोठी कामगिरी ठरत आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis : "कपडे आम्ही दिले, तरी आम्हालाच बोलतो?" — लोणीकरांच्या वक्तव्यावर राज्यभरात संताप

शेअर करा