मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

चारचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया

११ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

चारचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया

११ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा

पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. नागरिकांची होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी इच्छुक वाहनधारकांकडून आकर्षक (पसंतीचे) नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी आगाऊ अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुकांनी दिनांक ११ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्जासोबत डीडी (‘R.T.O., Pune’ नावाने), पत्त्याचा पुरावा व ओळखपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांची यादी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. अशा अर्जदारांनी दिनांक १२ मे २०२६ रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद लिफाफ्यात वाढीव रकमेचा डीडी जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता सहकार सभागृह, आरटीओ पुणे येथे लिलाव प्रक्रिया पार पडेल.

सदर प्रक्रियेनुसार सर्वाधिक रक्कम देणाऱ्या अर्जदारास संबंधित पसंती क्रमांक देण्यात येईल. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार लागू शुल्क आकारण्यात येईल.

शेअर करा