मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai news : आदित्य ठाकरेंकडून कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी

Mumbai news : कर्जत - टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा आता चर्चेत आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

आदित्य ठाकरेंकडून कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी
आदित्य ठाकरेंकडून कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी

Mumbai news : टोरेंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला विरोध; पर्यावरणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता


Mumbai news : कर्जत - टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. या वृक्षतोडीला स्थानिक स्तरावर विरोध होत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी जाऊन वृक्षतोडीची पाहणी केली. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि वृक्षतोडीबाबतचे प्रश्न यांमुळे हा विषय ऐरणीवर आला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रकल्पासाठी वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणपूरकतेच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या पाहणीला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही या प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. प्रकल्पाच्या परिसरात ९० हजार झाडे लावण्याचा दावा केला जात असताना, ही झाडे लावण्यासाठी जागा कुठे उपलब्ध होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गुजरातमध्ये गिफ्ट सिटीसारखे प्रकल्प उभारले जातात, तर महाराष्ट्राच्या वाट्याला प्रदूषणकारी प्रकल्प येतात, अशी टीकाही त्यांनी केली.

कर्जतमधील वृक्षतोड आणि प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत आता राजकीय पक्षांकडूनही भूमिका मांडली जात आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर नेमका किती परिणाम होणार आणि वृक्षतोडीबाबत कोणती उपाययोजना केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा