मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मेट्रो-३ च्या कामाची अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड झिरो'वर पाहणी!

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

मेट्रो-३ च्या कामाची अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड झिरो'वर पाहणी!

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार

निलेश राऊत
पुणे: पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी आणि आयटी हबला शहराशी जोडणाऱ्या माण–हिंजवडी–शिवाजीनगर ‘मेट्रो मार्ग-३’ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी पीएमआरडीए प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी विविध ठिकाणांना भेट देत कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

पीएमआरडीएकडून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाच्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’च्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पाहणीदरम्यान कामाची गुणवत्ता आणि प्रगती यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता उमेश मल्लावत, कनिष्ठ अभियंता सुमीत यादव, गजानन पाटील तसेच पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विद्यापीठ चौकातील पाषाण रॅम्प परिसरात महापालिकेच्या जलवाहिनीतून मोठी पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. या गळतीमुळे मेट्रोच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना ती तातडीने थांबविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.

तसेच ‘पीएआर २१’ येथे मेट्रो जिन्यासाठी आवश्यक जागा मोकळी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे या भागातील प्रलंबित काम मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. बाणेर येथील ‘पीएआर १५’ येथे सुरू असलेल्या जिन्याच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. केवळ वेग नव्हे, तर कामाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची राखावी, असे निर्देश के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.

"प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करणे हे आमचे प्राधान्य आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर दिलासा मिळावा, यासाठी पीएमआरडीए प्रशासन प्रयत्नशील आहे."
— के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त महानगर आयुक्त, पीएमआरडीए

शेअर करा