मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Actress Usha Chavan : माझ्या आईचा संसार उद्धवस्त केला, संपत्ती बळकावली : उषा चव्हाण यांच्यावर सुरेंद्र कडू यांचे गंभीर आरोप

वडिलांशी विवाह झाल्याची कागदपत्रे जाहीर करण्याचे आव्हान; कुटुंबाची संपत्ती बळकावल्याचा आरोप (Actress Usha Chavan) उषा चव्हाण यांची संपत्ती शासनान जप्त करण्याची मागणी

M
mubarak

2 मिनिट वाचन

Actress Usha Chavan : माझ्या आईचा संसार उद्धवस्त केला, संपत्ती बळकावली : उषा चव्हाण यांच्यावर सुरेंद्र कडू यांचे गंभीर आरोप

(Actress Usha Chavan News) शासनाला दिशाभूल करणारी माहिती देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न

  • वडिलांशी विवाह झाल्याची कागदपत्रे जाहीर करण्याचे आव्हान; कुटुंबाची संपत्ती बळकावल्याचा आरोप
  • (Actress Usha Chavan) उषा चव्हाण यांची संपत्ती शासनान जप्त करण्याची मागणी
  • पुणे, महाराष्ट्र मिरर : Actress Usha Chavan : ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्यावर सुरेंद्र कडू यांनी कौटुंबिक संबंध आणि मालमत्तेच्या वादातून गंभीर आरोप केले आहेत. उषा चव्हाण यांना कडू कुटुंबात कोणतेही कायदेशीर स्थान नसल्याचा दावा करत, आपल्या वडिलांशी त्यांचा विवाह झाला असल्यास त्यासंबंधीची अधिकृत कागदपत्रे त्यांनी सार्वजनिक करावीत, असे आव्हान कडू यांनी दिले आहे. हे सर्व आरोप कडू यांनी केले असून, त्याबाबत उषा चव्हाण यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. शासनाची दिशाभूल करणारी माहिती देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी त्यांना केला आहे.

    Actress Usha Chavan : माझ्या आईचा संसार उद्धवस्त केला, संपत्ती बळकावली : उषा चव्हाण यांच्यावर सुरेंद्र कडू यांचे गंभीर आरोप

    आपल्या आईचा संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत कडू यांनी उषा चव्हाण यांच्याबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. आपल्या वडिलांशी उषा चव्हाण यांचा विवाह झाला नव्हता, असा त्यांचा दावा आहे. अभिनेत्री म्हणून असलेल्या ओळखीचा फायदा घेत त्यांनी वडिलांशी जवळीक साधली आणि त्यानंतर कुटुंबाच्या मालमत्तेवर हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही कडू यांनी केला आहे. Actress Usha Chavan

    कडू यांनी मालमत्तेच्या व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. कुटुंबाच्या पूर्वीच्या काही मालमत्तांमध्ये वाद निर्माण करून संबंधित खरेदीदारांकडून वाढीव रक्कम घेण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. संबंधित मालमत्तांवर उषा चव्हाण यांचा कायदेशीर हक्क असेल, तर त्यांनी सर्व कागदपत्रे वकिलांसमोर सादर करून आपल्या नावाचा वैध टायटल रिपोर्ट तयार करून घ्यावा, असेही कडू यांनी म्हटले आहे. Maharashtra Mirror Actress Usha Chavan

    अभिनेते दादा कोंडके यांच्या पुस्तकाचाही कडू यांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ उल्लेख केला. उषा चव्हाण यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत दादा कोंडके यांनी त्यांच्या पुस्तकात काही मुद्दे मांडल्याचा दावा त्यांनी केला. Google

    कडू कुटुंबाच्या ज्या मालमत्तांवर कथितरीत्या ताबा अथवा हक्क प्रस्थापित करण्यात आला आहे, त्या मालमत्तांबाबत सरकारने चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुरेंद्र कडू यांनी केली. न्यायालयीन प्रक्रियेचाही उल्लेख करत त्यांनी संबंधितांनी आपला हक्क कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करावा, अशी भूमिका मांडली आहे.

    Actress Usha Chavan : माझ्या आईचा संसार उद्धवस्त केला, संपत्ती बळकावली : उषा चव्हाण यांच्यावर सुरेंद्र कडू यांचे गंभीर आरोप

    हेही वाचा: Mumbai news: घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू

    Mumbai news: घाटकोपरमध्ये चाळीवर दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू

    https://www.youtube.com/watch?v=nAdAJS5Px4o

    शेअर करा