Actress Usha Chavan : माझ्या आईचा संसार उद्धवस्त केला, संपत्ती बळकावली : उषा चव्हाण यांच्यावर सुरेंद्र कडू यांचे गंभीर आरोप
वडिलांशी विवाह झाल्याची कागदपत्रे जाहीर करण्याचे आव्हान; कुटुंबाची संपत्ती बळकावल्याचा आरोप (Actress Usha Chavan) उषा चव्हाण यांची संपत्ती शासनान जप्त करण्याची मागणी
2 મિનિટ વાંચન

(Actress Usha Chavan News) शासनाला दिशाभूल करणारी माहिती देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न
पुणे, महाराष्ट्र मिरर : Actress Usha Chavan : ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्यावर सुरेंद्र कडू यांनी कौटुंबिक संबंध आणि मालमत्तेच्या वादातून गंभीर आरोप केले आहेत. उषा चव्हाण यांना कडू कुटुंबात कोणतेही कायदेशीर स्थान नसल्याचा दावा करत, आपल्या वडिलांशी त्यांचा विवाह झाला असल्यास त्यासंबंधीची अधिकृत कागदपत्रे त्यांनी सार्वजनिक करावीत, असे आव्हान कडू यांनी दिले आहे. हे सर्व आरोप कडू यांनी केले असून, त्याबाबत उषा चव्हाण यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. शासनाची दिशाभूल करणारी माहिती देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी त्यांना केला आहे.

आपल्या आईचा संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत कडू यांनी उषा चव्हाण यांच्याबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. आपल्या वडिलांशी उषा चव्हाण यांचा विवाह झाला नव्हता, असा त्यांचा दावा आहे. अभिनेत्री म्हणून असलेल्या ओळखीचा फायदा घेत त्यांनी वडिलांशी जवळीक साधली आणि त्यानंतर कुटुंबाच्या मालमत्तेवर हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही कडू यांनी केला आहे. Actress Usha Chavan
कडू यांनी मालमत्तेच्या व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. कुटुंबाच्या पूर्वीच्या काही मालमत्तांमध्ये वाद निर्माण करून संबंधित खरेदीदारांकडून वाढीव रक्कम घेण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. संबंधित मालमत्तांवर उषा चव्हाण यांचा कायदेशीर हक्क असेल, तर त्यांनी सर्व कागदपत्रे वकिलांसमोर सादर करून आपल्या नावाचा वैध टायटल रिपोर्ट तयार करून घ्यावा, असेही कडू यांनी म्हटले आहे. Maharashtra Mirror Actress Usha Chavan
अभिनेते दादा कोंडके यांच्या पुस्तकाचाही कडू यांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ उल्लेख केला. उषा चव्हाण यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत दादा कोंडके यांनी त्यांच्या पुस्तकात काही मुद्दे मांडल्याचा दावा त्यांनी केला. Google
कडू कुटुंबाच्या ज्या मालमत्तांवर कथितरीत्या ताबा अथवा हक्क प्रस्थापित करण्यात आला आहे, त्या मालमत्तांबाबत सरकारने चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुरेंद्र कडू यांनी केली. न्यायालयीन प्रक्रियेचाही उल्लेख करत त्यांनी संबंधितांनी आपला हक्क कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करावा, अशी भूमिका मांडली आहे.

