मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Actor Govinda Hospitalised : गोविंदाला गोळी लागली, अभिनेता त्याच्याच बंदुकीने जखमी झाला.

Actor Govinda Hospitalised : बॉलिवूडचा गोविंदा जखमी झाला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Actor Govinda Hospitalised : गोविंदाला गोळी लागली, अभिनेता त्याच्याच बंदुकीने जखमी झाला.

Actor Govinda Hospitalised : बॉलिवूडचा गोविंदा जखमी झाला आहे. गोविंदाच्या पायाला त्याच्याच बंदुकीने गोळी लागली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता गोविंदा Actor Govinda Hospitalised जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गोळी लागली. ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. गोविंदा सकाळी कुठेतरी जाण्यासाठी निघाला असताना चुकून त्याच्या बंदुकीतील गोळी त्याच्या पायाला लागली. त्यानंतर गोविंदाला क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोविंदाची बंदूक आपल्या ताब्यात घेतली.त्यानंतर पोलीस या प्रकरणाच्या तपासात केला जात आहेत. गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच बिघडली आहे. सध्या गोविंदा अंधेरीच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस कुटुंबीयांचे जबाब नोंदवणार आहेत.

गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले की, अभिनेत्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. तो कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो रिव्हॉल्व्हर साफ करून कपाटात ठेवत होता. यादरम्यान पिस्तूल जमिनीवर पडले, त्यानंतर तो गोळीबार झाला. त्याच्या गुडघ्याखाली गोळी लागली. काळजी करण्यासारखे काही नाही.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सध्या मुंबईत नाही. गोविंदाला गोळी लागल्याची माहिती मिळताच ती मुंबईला रवाना झाली. येत्या दोन तासांत ती मुंबईत येणार आहे.

शेअर करा