मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Actor Dharmendra : बॉलिवूडचा 'ही-मॅन' हरपला! सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन!

Legendary Bollywood actor Dharmendra dies at 89 : सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सिनेसृष्टी शोकसागरात!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Actor Dharmendra : बॉलिवूडचा 'ही-मॅन' हरपला! सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन!

Legendary Bollywood actor Dharmendra dies at 89  : सहा दशके सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सिनेसृष्टी शोकसागरात!

मुंबई :- बॉलिवूडचा 'ही-मॅन' (He-Man) आणि हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. तब्बल सहा दशके भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या 'कोहिनूर' कलाकाराच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. Legendary Bollywood actor Dharmendra dies at 89

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे त्यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ते घरीच विश्रांती घेत होते. मात्र, अखेर त्यांच्या जुहू येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी येताच बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यापासूनच विविध प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, देओल कुटुंबीयांनी अद्याप धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली तरी, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

'शोले', 'यादों की बारात', 'धरम वीर' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाने कोट्यवधी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनाने कलासृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

शेअर करा