मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

ACP Transfer Order : राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच; मुंबईत नऊ एसीपींची बदली

•65 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपअधीक्षकांच्या बदल्या ; ठाणे, पुणे, मीरा-भाईंदरसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील अधिकाऱ्यांचा समावेश

V
Vivek

1 मिनिट वाचन

ACP Transfer Order : राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच; मुंबईत नऊ एसीपींची बदली

•65 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि उपअधीक्षकांच्या बदल्या ; ठाणे, पुणे, मीरा-भाईंदरसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील अधिकाऱ्यांचा समावेश

मुंबई :- राज्य सरकारने पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. गुरुवारी गृह विभागाने 65 सहायक पोलीस आयुक्त (ACP) आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबईतील नऊ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पोलीस वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

बदली झालेल्या मुंबईतील अधिकाऱ्यांमध्ये सहायक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, शशिकांत भोसले, सचिन जायभाय, मनिषा रावखंडे, कुसुम वाघमारे, योगेश गावडे, भागवत सोनावणे, शैलेश सणस आणि प्रिया पाटील यांचा समावेश आहे. तसेच, पोलीस उपअधीक्षक नीलम व्हावळ यांचीही बदली करण्यात आली आहे.

या बदल्यांमध्ये फक्त मुंबईतीलच नव्हे, तर ठाणे, मीरा-भाईंदर आणि पुणे ग्रामीण भागातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयातील दीपाली खन्ना, विजयकुमार मराठे आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे, पुणे ग्रामीणमधून सहायक पोलीस आयुक्त तानाजी बर्डे आणि ठाण्यातून उत्तम कोळेकर यांची मुंबईत बदली झाली आहे. या बदल्यांमुळे विविध शहरांमधील पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत.

हेही वाचा: Navi Mumbai News : खुनाच्या गुन्ह्यातील 13 वर्षांपासून फरार आरोपीला नागपूरमधून अटक

शेअर करा