मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Acharya Devrat : आता 'राजभवन' नव्हे, 'लोकभवन'! - राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राजभवनचे नामकरण

•केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अधिकृत बदल; राजभवन आता लोकाभिमुख संवाद आणि सहभागाचे केंद्र बनणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Acharya Devrat : आता 'राजभवन' नव्हे, 'लोकभवन'! - राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राजभवनचे नामकरण

•केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अधिकृत बदल; राजभवन आता लोकाभिमुख संवाद आणि सहभागाचे केंद्र बनणार

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात एक महत्त्वाचा बदल म्हणून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे 'महाराष्ट्र लोकभवन' असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला तात्काळ निर्देश दिले आहेत.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हा निर्णय अत्यंत दिशादर्शक असल्याचे सांगितले. 'लोकभवन' असे नामकरण केल्यामुळे राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि लोक कल्याणासाठी समर्पित होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

लोकाभिमुखतेवर भर

राज्यपाल यांनी या बदलामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आता 'लोकभवन' म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण केवळ राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय न राहता, ते राज्यातील नागरिक, समाजातील विविध घटक, विद्यार्थी, संशोधक, शेतकरी आणि नागरी संघटनांशी संवाद व सहभाग यांचे एक केंद्र बनले पाहिजे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोककल्याणासाठी राजभवन आता सक्रिय भूमिका घेणार आहे.

शेअर करा