मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Accident: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात युवा नेत्याचा जागीच मृत्यू

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

1 मिनिट वाचन

Accident

Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' बोगद्यात भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला धडक; शुक्रवारी पहाटे घडली दुर्घटना

पुणे, महाराष्ट्र मिरर

Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या 'मिसिंग लिंक' बोगद्यामध्ये शुक्रवारी पहाटे झालेल्या अत्यंत भीषण अपघातात वाकडमधील तरुण राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. शुक्रवारी पहाटे १:२० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. Accident Missing Link Tunnel Politician Killed

Water News : खडकवासला धरण साखळीमधील चारही धरणे भरली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टोयोटा फॉर्च्युनर कारमधून काही जण पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. बोगद्यामध्ये प्रवास करत असताना अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने पुढे चालणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेमुळे दोन्ही वाहने उलटली.

: म्हणे खड्डे दाखवा बुजवायला सांगतो….

या अपघातात फॉर्च्युनरमधील ३० ते ३५ वयोगटातील तरुण नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील इतर चार जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून, टेम्पोमधील प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.Accident

अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत होऊ दिली गेली नाही आणि वाहनांची ये-जा सुरळीत ठेवण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. Accident

तुषार भूमकर यांच्या निधनामुळे वाकड आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी शोककळा पसरली असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त होत आहे. मृत भूमकर यांच्या पत्नीने यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक लढवली होती. या अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा