मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aaditya Thackeray : विधानभवनात वादळपूर्व सकाळ! हिंदी सक्ती मागे, पण विरोधक आक्रमक

Aaditya Thackeray On Maharashtra Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचं विरोधकांविरोधात विधानभवनाबाहेर आंदोलन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aaditya Thackeray: Morning before the storm in the Vidhan Bhavan! Hindi compulsion is back, but the opposition is aggressive

Aaditya Thackeray On Maharashtra Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचं विरोधकांविरोधात विधानभवनाबाहेर आंदोलन

मुंबई : हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मागील काही दिवसांपासून राज्यात उफाळलेली राजकीय उलथापालथ अद्याप थांबलेली नाही. राज्य सरकारने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्रिभाषा सूत्रावरील दोन्ही निर्णय मागे घेतले असले, तरी विरोधकांचा रोष ओसरलेला नाही. आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात हेच चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी गटाने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधकांवर हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर निशाणा साधण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्याच्या व्यापक हितासाठी घेतल्याचे मतही या आंदोलनात मांडण्यात आले.

दुसरीकडे, विरोधक सरकारच्या यू-टर्नवर संतापलेले असून, हिंदी सक्तीचा विषय सभागृहात गाजण्याची शक्यता आहे. याशिवाय शक्तिपीठ महामार्गाचा विरोध, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी, 'लाडकी बहीण' योजनेच्या रकमेतील वाढ, समृद्धी महामार्गाची दुरवस्था आणि महागाईचे वाढते चटके या मुद्द्यांवरून देखील सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची तयारी आहे.

या पार्श्वभूमीवर आजपासून 18 जुलैपर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठण्याची शक्यता असून, सभागृहात वातावरण तापलेले राहील, हे निश्चित आहे.

शेअर करा