मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aaditya Thackeray Meet Ramesh Bais : आदित्य ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट..

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aaditya Thackeray Meet Ramesh Bais

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली

मुंबई :- राज्यात सीईटीच्या परीक्षा संदर्भात मोठा गोंधळ उडाला असून त्यासंदर्भात आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली आहे. सीईटी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विविध मागण्या संदर्भात ही भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यापूर्वीच सीईटी परीक्षेत किती गैरसमज आहे. हे सांगितले होते. विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय बाबत आणि परीक्षेतील गोंधळाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यपाल यांनी निपक्ष चौकशीचे आदेश देण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Aaditya Thackeray Meet Ramesh Bais

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील MH-CET परिक्षांमधील गोंधळाबद्दल प्रश्न उपस्थित केले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत.
1) फेरपरीक्षा नको पण पारदर्शकता हवी.
2) विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका हव्या आहेत.
3) विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि टॉपर्स जाणून घ्यायचे आहेत, फक्त पर्सेंटाइल नाही.

Aaditya Thackeray Meet Ramesh Bais

  • CET चा 1 पेपर 24 बॅचमध्ये घेण्यात आला.
  • 1425 आक्षेप घेण्यात आले आणि प्रत्येक आक्षेपासाठी, CET सेल ₹1000 आकारते आहे.
  • सीईटी सेलने पेपर्समध्ये 54 चुका मान्य केल्या आहेत.
  • ⁠त्यातील काही प्रश्नांमध्ये तर "MCQ मधील कोणताही पर्याय बरोबर नव्हता" अशाही चुका होत्या.
  • हे पेपर कोणी सेट केले?
  • ⁠ह्या अनागोंदी कारभारासाठी आयुक्तांना निलंबित का करू नये?
  • पर्सेंटाईल कसे ठरवले जाते?
  • मार्क्स का सांगितले नाहीत आणि उत्तरपत्रिका खुल्या का केल्या नाहीत?
  • कुठला पेपर सोपा आणि कुठला कठीण हे कोण ठरवतो?
    विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल अनभिज्ञ आहे हे दिसतंच आहे, पण बहुधा त्यांना परीक्षा आयोजित करणाऱ्या एजन्सीमध्येच स्वारस्य आहे आणि ॲाब्जेक्शन्समधून पैसे कमवायचे आहेत. आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
  • हेही वाचा: Bharat Shah : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले, उत्तर पश्चिम मुंबईतील अपक्ष उमेदवाराला आव्हान

    शेअर करा