मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Aaditya Thackeray : शाळेत जाऊनच शिका!" — आदित्य ठाकरेंचा शिक्षण मंत्र्यांवर जोरदार हल्ला

Aaditya Thackeray On Maharashtra Sarkar : हे सरकार चालवताय की कॉमेडी शो?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray On Maharashtra Sarkar : हे सरकार चालवताय की कॉमेडी शो? आदित्य ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल

मुंबई | राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचे मौखिक शिक्षण सक्तीचे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीकेची झोड उठवली असून, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शाळेत जाऊन आधी तुम्हीच धडे घ्या, मग इतरांना शिकवा!” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं, “पहिलीतील मुलांवर आधीच तीन भाषांची सक्ती आहे. त्यात आता मौखिक हिंदी शिकवा म्हणताय, पण पुस्तकच नाही! हे सरकार चालवताय की कॉमेडी शो?”

गुरुवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत हिंदीचे 'मौखिक शिक्षण' दिले जाईल आणि ही बाब अभ्यासक्रमात नाही, तर भाषेची ओळख म्हणून शिकवली जाईल. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही वाद थांबलेला नाही.

शेअर करा