मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदवाक्याला साजेशी कामगिरी ; मुंबई काँग्रेसकडून पोलिसांना सन्मानित

•मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, असलम शेख आणि आमदार अमीन पटेल यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सन्मानित केले

V
Vivek

1 मिनिट वाचन

'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदवाक्याला साजेशी कामगिरी ; मुंबई काँग्रेसकडून पोलिसांना सन्मानित

•मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, असलम शेख आणि आमदार अमीन पटेल यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सन्मानित केले

मुंबई :- गणेशोत्सव दरम्यान मुंबई पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बाबत तसेच ईद-ए-मिलाद या सर्व हिंदू आणि मुसलमानांच्या सणांच्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने मुंबई काँग्रेसकडून पोलिसांना सन्मानित करण्यात आले आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड ,माजी मंत्री असलम शेख आणि आमदार अमीन पटेल यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना सन्मानित केले आहे.'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदवाक्याला साजेशी कामगिरी महाराष्ट्र पोलिसांनी नुकत्याच उत्साहात पार पडलेल्या गणेशोत्सवात बजावली. आपल्या पोलीस बांधवांच्या कर्तव्यदक्षतेमुळेच ईद-ए-मिलाद चा सण देखील सुरक्षित वातावरणात आनंदाने साजरा करता आला. याबद्दल मुंबई काँग्रेसने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना भेटून संपूर्ण पोलीस पथकाच्या निस्वार्थ सेवेकरिता आभार प्रकट केले.

हेही वाचा: PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, कर्नाटकामधील गणपतीच्या घटनेवर भाष्य

शेअर करा