मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

राष्ट्रवादीत (अप) मोठा भूकंप! अर्थखाते न मिळाल्याने सुनेत्रा पवार नाराज

मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर, तटकरे-भुजबळांमध्ये खडाजंगी!

PG
Prashik Ghaste

3 मिनिट वाचन

राष्ट्रवादीत (अप) मोठा भूकंप! अर्थखाते न मिळाल्याने सुनेत्रा पवार नाराज

मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर, तटकरे-भुजबळांमध्ये खडाजंगी!

‘देवगिरी’ बंगल्यावरील बैठकीत उडाला प्रचंड गोंधळ

पार्थ पवारांची बैठकीतून तडकाफडकी एक्झिट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी १३ दिवसांनंतर आपला प्रत्यक्ष पदभार स्वीकारला खरा, पण आता महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची तीव्र भावना पक्षात निर्माण झाली आहे.

याच तीव्र नाराजीतून मुंबईतील ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी आयोजित पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी भाजपवर आणि महायुतीवर निशाणा साधला. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीला महत्त्वाचे मानले जाणारे अर्थखाते दिले जात नसल्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी जाहीरपणे तीव्र खंत व्यक्त केली असून, यामुळे पक्षात प्रचंड नाराजी पसरल्याचे समोर आले आहे.

वारंवार मागणी करूनही खाते देण्यास टाळाटाळ
अजितदादा पवार जिवंत असताना राज्याचे अर्थखाते नेहमीच राष्ट्रवादीकडे होते. त्यामुळे त्याच न्यायाने आणि राजकीय परंपरेनुसार हे खाते आताही राष्ट्रवादीलाच मिळावे, अशी पक्षाची रास्त अपेक्षा होती. मात्र, वारंवार मागणी करूनही भाजपकडून हे खाते देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या आजी-माजी आमदारांच्या बैठकीत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

अंतर्गत गृहकलह आणि गटबाजी
याच महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादीमधील अंतर्गत गृहकलह आणि गटबाजी देखील चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे मुंबईत असूनही या संवेदनशील बैठकीला गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या मायलेकांच्या एकतर्फी कारभारामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची फळी आधीपासूनच नाराज असल्याची चर्चा रंगली असताना, पटेलांच्या गैरहजेरीने यावर शिक्कामोर्तब केले आहे.

तटकरे-भुजबळ खडाजंगी
प्रफुल्ल पटेलांच्या गैरहजेरीमुळे बैठकीत आधीच तणावाचे वातावरण असताना, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात भर बैठकीतच जोरदार खडाजंगी झाल्याने गोंधळ उडाला. सुनील तटकरे यांनी अत्यंत आक्रमकपणे नाराजी व्यक्त करत, “पक्षावर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह आमच्यावर टीका होत असताना पक्षातले इतर नेते किंवा नेतृत्व आमच्या पाठीशी का उभे राहत नाही? आम्ही दोघेच का नेहमी टीकेचे धनी व्हायचे?” असा थेट सवाल केला.

त्यांच्या या भूमिकेवर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेत “जे झाले ते झाले, आता पुढे जाऊया,” असा सल्ला दिला, ज्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. विशेष म्हणजे, तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीतून तडकाफडकी काढता पाय घेतला. बैठकीनंतर भुजबळांनी कोणताही वाद झाला नसल्याचे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला, तरी सध्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये प्रचंड चलबिचल सुरू असून, काही आमदारांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा आहे.

तटकरे-भुजबळ वाद
तटकरेंचा नेतृत्वावर थेट निशाणा: ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी पक्षात ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याचा आरोप केला. अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेल आणि आपणच पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असताना इतर नेते आणि स्वतः पक्ष नेतृत्व आमच्या बचावासाठी पुढे का येत नाही, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला.

भुजबळांचा आक्षेप अन् सारवासारव: तटकरेंच्या या विधानावर छगन भुजबळ यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि जुन्या गोष्टी उकरून न काढता पुढे जाण्यास सांगितले, ज्यावरून भर बैठकीत खडाजंगी झाली. मात्र, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळांनी खडाजंगीचा इन्कार करत, आम्हाला दुसऱ्या कमिटीच्या बैठकीसाठी सतत फोन येत असल्याने आपण घाईघाईत आवरते घेण्यास सांगितल्याचा दावा केला.

प्रफुल्ल पटेलांची गैरहजेरी
पटेलांच्या भूमिकेभोवती संभ्रम: पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल मुंबईत हजर असतानाही पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीकडे त्यांनी फिरवलेली पाठ राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार असल्याचे संकेत देत आहे.

शरद पवारांच्या भेटीमुळे खळबळ: अजितदादांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या अस्वस्थतेतून आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून नुकतीच सुनील तटकरे यांच्यासह काही प्रमुख आमदारांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची गुप्त भेट घेतल्याने महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

शेअर करा