मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Zeeshan Siddiqui join Ajit Pawar's NCP? : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का! झीशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?

Zeeshan Siddiqui join Ajit Pawar's NCP?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Zeeshan Siddiqui join Ajit Pawar's NCP? : निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का! झीशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?

Zeeshan Siddiqui join Ajit Pawar's NCP? : काही महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. झीशान सिद्दीकी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election काँग्रेसला Congress. आणखी एक मोठा धक्का बसू शकतो. आमदार झीशान सिद्दीकी MLA Zeeshan Siddiqui हे बंडखोर होऊ शकतात. ते आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी आधीच काँग्रेस सोडून अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.आज मुंबईत काढण्यात येणाऱ्या अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेत झीशान सिद्दीकी यांचे पोस्टर्सही पाहायला मिळाले आहेत. मात्र, काँग्रेसने अद्याप त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही. पण आज काही कारवाई होऊ शकते.

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथून प्रथमच आमदार झालेले झीशान सिद्दीकी हे महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीला काँग्रेसचा राजीनामा दिला आणि अजित पवार AjitPawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झीशान सिद्दीकी यांच्या वडिलांचे प्रवेशानंतर त्यांना काँग्रेस युवा संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

हेही वाचा: Mumbai Doctor Attack : सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर हल्ला केल्यानंतर पोलिसांची कारवाई, दोघांना अटक

शेअर करा