मुख्य मजकुराकडे जा

बघितल्याचा रागातून व्यक्तीवर कटरने हल्ला

पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

बघितल्याचा रागातून व्यक्तीवर कटरने हल्ला
पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : सकाळी माझ्याकडे का बघत होतास, असे विचारत एका तरुणाने व्यक्तीच्या तोंडावर कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (२१ नोव्हेंबर) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गांधीनगर, पिंपरी येथील एका किराणा दुकानाजवळ घडली.

याप्रकरणी एका महिलेने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सत्यम काळूराम शिंदे (२८, गांधीनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती त्यांची दुचाकी पार्क करत असताना तिथे बसलेल्या तोंडओळखीच्या आरोपीने त्यांच्याशी वाद घातला. आरोपीने शिवीगाळ करत हाताने, लाथा-बुक्क्यांनी व सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून मारहाण केली. त्यानंतर हातातील धारदार कटरने फिर्यादीच्या पतीच्या तोंडात वार करून हिरड्या, ओठ आणि तोंडाच्या दोन्ही बाजूस गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper