मुख्य मजकुराकडे जा

पदवी म्हणजे केवळ कागदाचा तुकडा; कौशल्याशिवाय तिचा उपयोग नाही – मुख्यमंत्री फडणवीस

तरुणांनी व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा; उल्हासनगरमधील सीएचएम महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पदवी म्हणजे केवळ कागदाचा तुकडा; कौशल्याशिवाय तिचा उपयोग नाही – मुख्यमंत्री फडणवीस
तरुणांनी व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा; उल्हासनगरमधील सीएचएम महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

उल्हासनगर : आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक पदवी मिळवून चालणार नाही, तर त्या पदवीसोबत व्यावहारिक कौशल्य आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य आणि उपयोजित ज्ञान नसेल, तर पदवी हा केवळ कागदाचा तुकडा ठरतो, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उल्हासनगर येथील सीएचएम महाविद्यालयात कौशल्य विकासासाठी उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

शिक्षणाचा खरा उद्देश केवळ पदवी मिळवणे नसून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात आणि व्यावसायिक क्षेत्रात सक्षम बनवणे हा आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे विषयाचे ज्ञान, कौशल्य आणि ते प्रत्यक्षात वापरण्याची क्षमता असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकासाला प्राधान्य देणाऱ्या सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत होईल. त्यामुळे युवकांनी केवळ गुण आणि पदवी यांच्यापुरते मर्यादित न राहता स्वतःची कार्यक्षमता वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper