मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

जितेंद्र आव्हाडांना चॅलेंज देणाऱ्या सहर शेख पोलिसांच्या कचाट्यात! 'मुंब्रा हिरवं करण्याच्या' विधानानंतर नोटीस जारी; सामाजिक सलोखा राखण्याचे आदेश

•एमआयएमच्या विजयानंतर आव्हाडांना विचारला होता 'कैसा हराया?'; आता वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणी वाढल्या; पोलिसांनी बजावली ताकीद

V
Vivek

1 मिनिट वाचन

JItendra-Awhad

•एमआयएमच्या विजयानंतर आव्हाडांना विचारला होता 'कैसा हराया?'; आता वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणी वाढल्या; पोलिसांनी बजावली ताकीद

मुंब्रा l राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा या बालेकिल्ल्यात एमआयएमच्या (AIMIM) तिकीटावर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या सहर शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी केलेले एक प्रक्षोभक विधान त्यांच्या अंगलट आले असून, मुंब्रा पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर सहर शेख यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आणि आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. विजयानंतर त्यांनी "कैसा हराया?" असे म्हणत जितेंद्र आव्हाडांना डिवचणारा व्हिडिओ व्हायरल केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी "मुंब्र्याला हिरवं करायचं आहे" असे विधान केल्याचा आरोप आहे. या विधानामुळे समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो आणि धार्मिक सलोखा बिघडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंब्रा पोलिसांची 'नोटीस' सहर शेख यांच्या भाषणाची गंभीर दखल घेत मुंब्रा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 168 नुसार नोटीस बजावली आहे. "ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल किंवा दोन समुदायांत तेढ निर्माण होईल, असे कोणतेही भाषण करू नये. तसेच सोशल मीडियावर बोलताना संयम राखावा," असे स्पष्ट निर्देश पोलिसांनी या नोटीसद्वारे दिले आहेत.

राजकीय संघर्षाला नवे वळण मुंब्र्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (ज्यात ठाकरे गट आणि मनसेही होते) असा सामना असताना सहर शेख यांनी एमआयएमकडून मारलेली धडक चर्चेचा विषय ठरली होती. निष्ठावंतांना डावलून युती धर्मामुळे अनेकांचे तिकीट कापले गेल्याचा फटका आव्हाडांना बसला असतानाच, आता सहर शेख यांच्यावर झालेल्या या पोलीस कारवाईमुळे मुंब्र्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

हेही वाचा: Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत 'हायव्होल्टेज' ड्रामा! ठाकरेंचे 4 नगरसेवक 'डांबून' ठेवल्याचा आरोप; पोलिसांत तक्रार करण्याचा अल्पेश भोईरांचा इशारा

शेअर करा