मुख्य मजकुराकडे जा

अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; पुण्यातील ८ हॉटेल्सवर एफडीएची मध्यरात्री धडक कारवाई

२० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची तपासणी; ८ चे परवाने निलंबित

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; पुण्यातील ८ हॉटेल्सवर एफडीएची मध्यरात्री धडक कारवाई
२० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची तपासणी; ८ चे परवाने निलंबित

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे. काल मध्यरात्री एफडीएच्या पथकाने शहरातील तब्बल २० हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर अचानक छापे टाकून तपासणी केली. या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने आठ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींना प्राधान्य देत एफडीएकडून ही विशेष मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान काही खाद्य आस्थापनांमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे तसेच अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित आठ हॉटेल्स आणि रेस्टॉरंटविरोधात परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper