MPSC Paper Scam : MPSC भरती परीक्षेचा पेपर 40 लाखांना मिळणार, उमेदवारांना गुंडांचे फोन, 3 जणांना अटक

MPSC Exam Update : एमपीएससी भरती परीक्षेत फसवणुकीचा प्रयत्न पुणे पोलिसांनी हाणून पाडला. एमपीएससी परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांना 40 लाख रुपयांची ऑफर करण्यात आली होती.
पुणे :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) उमेदवारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. MPSC Exam Paper Leaking News पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. Pune Police News या तिघांनी एमपीएससी भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना फोन करून प्रश्नपत्रिकेसाठी 40 लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे.प्रश्नपत्रिका फुटल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दीपक गयाराम गायधने, सुमित कैलास जाधव आणि योगेश सुरेंद्र वाघमारे अशी आरोपींची नावे आहेत.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने Pune Police Crime Branch शनिवारी कारवाई केली. त्यांनी सांगितले की, एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी सांगितले होते की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता.कॉलरने उमेदवारांना परीक्षेचा पेपर 40 लाख रुपयांना देऊ केला होता.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे म्हणाले, ‘याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपींना चाकण परिसरातून तर तिसऱ्याला नागपुरातून अटक करण्यात आली. ते म्हणाले की, आतापर्यंत केलेल्या तपासणीनुसार परीक्षेचा पेपर फुटल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी 24 विद्यार्थ्यांची यादीही जप्त केली आहे. आरोपींनी विद्यार्थ्यांना बोलावण्याचा कट रचला होता. पोलिसांनी सांगितले की, तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.