मुंबई

छत्रपती संभाजी महाराजांवरील वादग्रस्त मजकूर, विकिपीडियाच्या संपादकांवर एफआयआर दाखल होणार!

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडिया पेजवर आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याने महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत असून आता पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे.

मुंबई :- ओपन सोर्स प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेल्या वादग्रस्त मजकुराच्या संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल विकिपीडियाच्या त्या सामग्रीच्या संपादकांविरुद्ध एफआयआर नोंदवणार आहे.महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाला मजकूर काढून टाकण्यासंदर्भात 10 हून अधिक मेल पाठवले होते परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

विकिपीडियावरून केवळ स्वयंचलित उत्तर आले आहे परंतु कोणतीही कारवाई केली गेली नाही. विकिपीडियाने सामग्री काढली नाही किंवा पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. सूत्रांनी सांगितले की, विकिपीडियाने आयटी कायद्याच्या कलम 69 आणि 79 चे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी आता विकिपीडियाच्या 4-5 संपादकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांनी यापूर्वीच निर्देश कारवाई करण्याच्या निर्देश दिले होते. संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर उपलब्ध आक्षेपार्ह माहिती पाहता फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली होती. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर सेलला सूचनाही दिल्या होत्या.ज्यामध्ये वस्तुस्थितीचा विपर्यास करून मांडला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0