मुंबईक्राईम न्यूज

Mira Road Share Market Fraud News : शेअर मार्केटच्या नावाने आर्थिक फसवणूक ; फसवणुकीतील पैसे परत करण्यास पोलिसांना यश

Mira Road Crime News काशिगाव पोलीस ठाण्वास यश ;शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील 5 लाख रक्कम तक्रारदार यांना परत

Mira Road Crime News :- शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारे घटना सातत्याने वाढत असताना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील मिरा रोड पूर्व परीसरात राहणारे सब्यासाची पात्रा यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवून एकूण 35 लाख 62 हजार आर्थिक फसवणूक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस स्टेशन येथे भादवीसं कलम 420,34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनीयम कलम 66 (सी), 66(डी) प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती डाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बैंकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिगाव पोलीस ठाणेचे अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 5 लाख रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Mira Road Crime News

पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि 01, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे. Mira Road Crime News

नागरीकांना आवाहन

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कावदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनयर संपर्क साधून तक्रार द्यावी. Mira Road Crime News

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

Telegram Channel, facebook, Instagram अथवा Whatsapp वर जास्त परतावा देणा-या Promotional Adds वर विश्वास ठेवू नका. आपली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. अश्या प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, Whatsapp Group पर ॲड करुन तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Screenshot, Messages दाखवुन पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत केले जाते. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवुन फसवणुक करण्यात येते. एकदा गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुकदारांना जास्त व खात्रिशिर परताव्याची हमी देतात. अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणुक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.

Share Market, Forex Trading, Crypto Investment, Mutual Funds मधील गुंतवणूक करण्याअगोदर आपल्या चितीय सल्लानारासोबत चर्चा करुनच गुंतवणूक करा. कोणतेही अनाधिकृत ॲप्लीकेशन डाऊनलोड करु नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करुन नये. ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ वैकेला संपर्क करावा. Mira Road Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0