Mira road Cyber Scam : काशिमीरा सायबर पोलिसांची मोठी कामगिरी ; ऑनलाइन फसवणूक झालेल्या व्यक्तीचे पैसे परत करण्यास पोलिसांना यश
शेअर मार्केटमध्ये ऑन लाईन गुंतवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुक केलेले 16 लाख 63 हजार रुपये पैकी 14 लाख 50 हजार रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात काशिमीरा पोलीस ठाण्यास यश
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा परीसरात राहणा-या पंकज सुरेशचंद्र श्रीवास्तव यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक झाली होती. फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस ठाणे भादविस कलम 420,34 सह माहीती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 कलम 66 (सी), 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mira Road Cyber Scam
तक्रारी बाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाचत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंकखात्यात भरती झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बैंकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी पाठ पुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी 14 लाख 50 हजार रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Mira Road Cyber Scam
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01 मिरा रोड,विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार दिनेश आहेर यांनी पार पाडली आहे. Mira Road Cyber Scam