मुंबई

Mumbai Police News : वसई-विरार,मीरा-भाईंदर पोलीस त्यांच्या हस्ते पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार

•फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते सत्कार

मीररोड :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून दर महिन्याला पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरी बाबत पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. मिरा रोड पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात पोलिस अधिकारी कर्मचारी यांना आयुक्तांनी सन्मानित केले.

1.पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार स्विकारताना गुन्हे शाखा कक्ष -3 चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणा-या विरार, अर्नाळा, नालासोपारा परिसरात गेल्या काही महिण्यांपासुन रस्त्यावरुन वाहन चालवणा-या महीलांची, मोटारसायकलस्वार अज्ञात आरोपीत व्दारे मंगळसुत्र, सोन्याची चैन जबरीने खेचुन चेन स्नॅचींग प्रमाण वाढल्याने 27 जानेवारी रोजी रा. 10.00 वाजेच्या सुमारस फिर्यादी हया त्यांचे ॲक्टीव्हा स्कुटरने घरी जात असताना जुने विवा कॉलेजजवळ रिलायन्स मार्ट येथे अज्ञात आरोपीत यांने फिर्यादी याचे पाठीमागुन स्पोर्ट मोटारसायकल वरुन येवून फिर्यादी यांचे गळयातील 95 हजार 17.430 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जु.वा. कि.सु. हे जबरीने खेचुन जकात नाका विरार प. बाजुकडे पळून गेला म्हणून विरार पोलीस ठाणे गुन्हा रजि न भा.द.वी.सं. कलम 392 प्रमाणे अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. Mumbai Police News

गुन्हयातील आरोपीत याचा शोध घेणे करीता पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्हा उघडकीस आणणे करीता उक्त गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा कक्ष -3 कडे देण्यात आला. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष -3 चे वेगवेगळे पोलीस पथक तयार करून आयुक्तालय परिसरात घडणारे चैन स्नॉचिंगचे विविध गुन्हयाचे अवलोकन करुन आरोपीत याने गुन्हयात वापरलेले वाहन तसेच आरोपीत याची गुन्हे करण्याची पध्दती वरुन गुप्त बातमीदार याचे मार्फतीने आरोपीत याची माहीती मिळवुन आरोपीत नामे अमित नथु शनवार वय (28 वर्षे) रा. तलासरी, ता. डहाणु, जि. पालघर यास गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व हेल्मेट सह ताब्यात घेवुन त्याचे कडे कौशल्यपूर्वक तपास करता पोलीस कोठडी दरम्यान एक सोन्याची चैन व सोन्याची लगड असा 73.500 ग्रॅम वजनाचा 4 लाख 38 हजार 200 रुपये किंमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होते. Mumbai Police News

2.पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार स्विकारताना पोलीस निरीक्षक शहुराज रणवरे

आचोळे पोलीस ठाणे गुन्हा भादविस कलम 377, 363 राह पोस्को 4,6,8,10 प्रमाणे या गुन्हयातील फिर्यादी या दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 12.15 वाजता ते 12.30 वाजताचे सुमारास त्यांचे राहते घरी झोपलेले असताना त्यांची पिडीत मुलगी वय 7 वर्षे ही तिचा चष्मा विसरल्याने तो घेण्यासाठी घरी आली असता पिवळा टी शर्ट व निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला, वय अंदाजे 25-30 वर्षे वयाचा अनोळखी आरोपी इसम हा बिल्डींगमध्ये आला. त्याने फिर्यादीच्या मुलीच्या हाताला पकडून ती विरोध करीत असताना जबरदस्तीने त्याने तिच्या हाताला पकडुन बिल्डींगच्या टेरसवरती नेवून जबरदस्तीने पीडीत मुलीशी अनैसर्गीक संभोग केल्याबाबत फिर्यादी यांनी आचोळे पोलीस ठाण्यात 13 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.Mumbai Police News

गंभीर गुन्हयाची बातमी प्राप्त होताच मा. वरीष्ठांच्या आदेश व सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष -2 वसई कार्यालयाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयाच्या घटनास्थळावरुन पळून जात असताना सी सी टी व्ही वॅमेरामध्ये चित्रीत झालेल्या आरोपीताच्या प्राप्त अस्पष्ट फोटोचे आधारे अनोळखी आरोपीताचा शोध चालू झाला. सदर आरोपीत हा घटनास्थळावरुन पळून गेल्यानंतर आजुबाजुचे परीसरातील सी सी टी व्ही कॅमे-याचे फुटेजचे आधारे व गोपणीय बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदर आरोपीत हा नालासोपारा प. एस.टी. डेपो जवळील झोपडपटटीमध्ये व डोंबीवली ता. कल्याण येथे राहत असल्याची माहीती प्राप्त झाली. तात्काळ दोन्ही ठिकाणी पोलीस पथक पाठवुन आरोपीताचा त्या परीसरात शोध घेतला. तपासामध्ये आरोपीचा मो.नं. प्राप्त करून तांत्रिक विश्लेषनाव्दारे प्रवास करीत असलेल्या अजमेर एक्सप्रेस या ट्रेनचा अचूक अंदाज घेवून तपास पथक तात्काळ गुजरात बाजूकडे रवाना केले. सदर आरोपीत हा सुरत शहरात आल्याने सुरत सिटी क्राईम ब्रांच यांचे मदतीने आरोपीतास सुरत येथून ताब्यात घेण्यात आले आहे. Mumbai Police News

3.पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार स्विकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी

नवघर पोलीस ठाणे येथे 05 ते 07 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.00 वा. साधुराम हॉटेल, भाजीमार्केट जवळ, बी.पी. क्रॉस रोड, भाईदर पूर्व, ता.जि. ठाणे या ठिकाणा जवळील सार्वजनिक शौचालयामध्ये एक अनोळखी पुरूष इसम वय अंदाजे 30 ते 35 वर्षे वयोगटातील अनोळखी पुरूष जातीचा इसम यास कोणीतरी अज्ञात इसमांनी जिवेठार मारण्याच्या उद्देशाने त्यास जबर दुखापत करुन मरणासन्न अवस्थेत टाकुन दिल्याचे पाहिले असता, त्यांनी समक्ष नवघर पोलीस ठाणे येथे हजर होवुन दिलेल्या खबरी वरुन नवघर पोलीस ठाणे गुन्हा भा.दं. वि. सं. कलम – 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. Mumbai Police News

गन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाने गुन्हयाचा गतीमान पध्दतीने तपास सुरू करुन गुन्हयाचे घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाचे आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच परिसरातील गुप्त बातमीदारांचे सहाय्याने व तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपी यांचा शोध घेवुन गुन्हयात एकुण 04 आरोपी यांना नवघर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी 6 तासाचे आत अटक करुन गुन्हा उघडकीस आनला आहे.

4.पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार स्विकारताना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम पोलीस निरीक्षक राहुल राख

2 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी च्या मध्यरात्री फिर्यादी यांनी त्याचे ताब्यातील ऑटो रिक्षा हि भाईंदर पश्चिम येथील राई पुला जवळ सार्वजनिक रस्त्यावर पार्क करुन घरी गेले असता अज्ञात इसमाने स्वताच्या फायदयाकरीता लबाडीच्या ईरादयाने चोरी केली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी भाईंदर पोलीस ठाणेत अज्ञात इसमा विरुध्द भादविस कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे शाखा करत होती.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात दिवसेनदिवस वाहन चोरीचे प्रमाणात वाढ होत असल्याने अशा गुन्हयांना आळा घालणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), व मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी सुचना देण्यात आल्या होत्या. Mumbai Police News

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप कदम यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यानी घडणाऱ्या प्रत्येक वाहन चोरीच्या गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवून आरोपींचा शोध घेत असताना पोहवा/शिवाजी पाटील यांना त्याचबातमीदारा बातमी मिळाली की, एक इसम विरार पूर्व येथील रामु कम्पाऊन्ड, अंबा मदीराचे पाठीमागील बाजुच्या एका कोप-यात चोरीच्या रिक्षा व मोटार सायकल डम करुन त्याचे पार्ट वेगवेगळे करुन विक्री करत आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताञय सरक व पथक यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करुन सापळा रचला असता एक इसम रिक्षाची छेड छाड करीत असल्याचे दिसल्याने आश्रफ ऊर्फ सलमान मंहमद परवेज शेख, (32 वर्षे) रा. रुम क्र.०६, गगनगिरी अपार्टमेन्ट, मकवाना कॉम्पेक्स, गोपचरपाडा, विरार पूर्व ता. वसई जि.पालघर यास शिफातीने ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने वर नमुद गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याचे बाजुस उभ्या असलेल्या 9 रिक्षा व 2 मोटर सायकल त्याने त्याचे साथीदार याचे सोबत चोरल्या असल्याचे सांगितल्याने त्याने चोरी केलेल्या 9 रिक्षा, 2 मोटर सायकल व मोबाईल फोन असा एकुण 6 लाख 88 हजार 500 रुपये किंमतीचा मुददेमाल त्याचेकडुन जप्त करण्यात आला असुन मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, मुंबई शहर आयुक्तालय, ठाणे शहर आयुक्तालय येथील खालीलप्रमाणे एकुण 11 चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

5.पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार स्विकारताना पोलीस निरीक्षक अमर मराठे

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थाचे समूळ उच्चटन करणेकरिता पोलीस आयुक्त यांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत.

त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी आयुक्तालय कार्यक्षेत्रातील अंमली पदार्थ खरेदी विक्री करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत तोंडी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विक्रीकरीता कब्जात बाळगणारे ईसमांविरुध्द कारवाई करिता माणिकपुर, वालीव, नायगाव परिसरात गस्त करीत असताना 9.25 वा. चे सुमारास दि मॉडर्न इंग्लिश हायस्कूल आणि कॉलेज, सोमेश्वर नगर, जुचंद्र, नायगांव (पूर्व) रस्त्याच्या बाजुला, ता.वसई, जि. पालघर या ठिकाणी इसम नामे १) अमित निरंजन सिंग, (31 वर्षे) 2) आशिष देविंद्र प्रकाश भारदाज, (28 वर्ष) 3) अभिषेक अनिल सिंग, (26 वर्षे) 4) सतेंद्र रामजी पाल उर्फ सोन (31 वर्षे), या चार इसमांनी स्वतःच्या कळ्यात एकण 5 किलो 50 ग्रॅम वजनाचा दोन कोटी 17 लाख 60 हजार किंमतीचा उच्च प्रतीचा चरस हा अंमली पदार्थ व्यावसायीक प्रमाणात बाळगला असताना मिळून आले असून सदरबाबत पोलीस हवालदार प्रदीप दत्ताराम टक्के यांचे फिर्यादी वरुन नायगाव पोलीस ठाणे गुन्हा एन.डी.पी.एस. कायदा १९९४ चे कलम 8 (क), 20 (ब) Ⅱ (क), 29 प्रमाणे प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत चालु असुन अटक आरोपी क्र. 1 ते 4 यांचे कब्ज्यात मिळून आलेला चरस हा अंमली पदार्थ विक्रीकरीता पुरविणारा पाहिजे आरोपी बाबुलाल हवालदार यादव (42 वर्षे), यास दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी कुसर गाव, मालाड (पूर्व) येथुन ताब्यात घेउन अटक करण्यात आली आहे.

अनु.क्र.8 यांनी गुन्हयाचे तपासा दरम्यान अटक आरोपी क्र. 1 ते 4 यांचे मोबाईल क्रमांकाचे सीडीआर, एसडीआर व तांत्रिक विश्लेषण करन मदत केली आहे.

6.पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार स्विकारताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार

विरार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी 2.30 वा.सुमारास विरार वजन काटा, चंदनसार रोड, विरार (पु.) येथे एक इसम गांजा नावचा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशिर बातमी विरार पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळाल्याने, सदर बातमीचे आधारे मिळालेले बातमीचा आशय वरिष्ठांना कळवुन, वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचना व आदेशान्वये लागलीच सदर ठिकाणी सापळा रचुन आरोपीतांना शिताफिने ताब्यात घेतले. सदर आरोपी याने त्याचे नाव विकास मौर्या (26 वर्षे), रा. अंधेरी (पु.), मुंबई असे सांगितले. नमुद आरोपीताची अंगझडती घेतली असता, त्यांचे कब्जात 10 किलो वजनाचा एकुण दोन लाख रुपये रुपये किंमतीचा गांजा नावाचा अंमली पदार्थ, मिळून आल्याने, तो जप्त करण्यात आला आहे. घटनेच्या अनुषंगाने विरार पोलीस ठाणे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ (रक़्घ्छ) अधिनियम-1985 चे कलम-8 (क), 20 (ब), त्(ब) प्रमाणे 1 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Mumbai Police News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0