मुंबई

अजितदादांचे स्मारक की संग्रहालय? पार्थ आणि जय पवारांमध्ये मतभेद; बारामती की पुणे? जागेवरून पेच वाढला

•संग्रहालय पुण्यातच असावे, जय पवारांचा आग्रह; तर पार्थ पवार दोन्ही गोष्टींसाठी बारामतीवर ठाम; सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात आणि जिल्हा बैठकीत काय होणार?

मुंबई | अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे त्यांचे स्मारक उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, हे स्मारक आणि संग्रहालय नेमके कुठे असावे, यावरून पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात दोन वेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत. मंगळवारी मंत्रालयात सुनेत्रा पवार यांच्या दालनात या विषयावर चर्चा झाली, ज्यात जय पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

जय पवार विरुद्ध पार्थ पवार: दोन वेगळी मते

जय पवार यांची भूमिका: अजितदादांचे पुणे शहर आणि जिल्ह्यावर अतोनात प्रेम होते. त्यामुळे त्यांचे संग्रहालय पुणे शहरात असावे, जेणेकरून त्यांच्या आठवणी शहरवासियांच्या जवळ राहतील. तर त्यांचे स्मारक बारामतीत असावे, असा त्यांचा आग्रह आहे.

पार्थ पवार यांची भूमिका: पार्थ पवार यांच्या मते, अजितदादांची कर्मभूमी बारामती राहिली आहे. त्यामुळे स्मारक आणि संग्रहालय या दोन्ही गोष्टी बारामतीतच एकाच ठिकाणी असाव्यात, जेणेकरून तिथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळेल.

सुनेत्रा पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला

उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यावेळी त्या आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

पुणे जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक

उद्या, 12 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची (DPC) महत्त्वाची बैठक होणार आहे.

अजितदादांनी जानेवारी महिन्यात या बैठकीच्या पूर्वतयारीच्या सूचना दिल्या होत्या. या बैठकीत
सन 2026-27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली जाईल.

अजितदादांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच ‘नियोजन’ बैठक असल्याने ती अत्यंत भावूक असेल.
दादांनी सुरू केलेल्या विकासकामांना गती देण्यावर या बैठकीत भर दिला जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0