मुंबई

Ravindra Waikar in Shinde Gat : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का !!! उद्धव ठाकरे यांचा खास शिल्लेदार, आक्रमक नेता, शिंदे गटात

शिवसेना नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेचे साथ सोडत शिंदेंच्या सेनेत केला प्रवेश

मुंबई :- उद्धव ठाकरे यांच्या जवळचे सहकारी नेते जोगेश्वरी पूर्वचे आमदार आक्रमक नेता म्हणून ओळख असलेल्या रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रवींद्र वायकर यांचा प्रवेश उद्धव ठाकरे यांना धक्कादायक ठरणार असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचे सातत्याने बोलले जात आहे त्यातच रविवारी (10 मार्च) रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश उद्धव ठाकरे यांना धक्का असल्याचे समजले जात आहे. शनिवारीच उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची भेट घेतली होती आणि रविवारी रवींद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश हा घटनाक्रम मुळे उद्धव ठाकरे सेनेमध्ये नाराजीचे सूर अधिक तीव्र उमटत असल्याचे दिसून आले आहे. काल दुपारी ही उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही आपली खदखद जाहीर सभेत मांडली त्यांनीही काही प्रत्यक्षरीत्या आरोप न करता काही गोष्टी बोलावून दाखवले आहे. या घटनेनंतर रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद करताना म्हणाले की, जनतेचा विकासासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये जाणे गरजेचे आहे. Ravindra Waikar in Shinde Gat

आमदार रवींद्र वायकर काय म्हणाले?

गेली 50 वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. 1974 सालची जोगेश्वरीच्या पहिल्या दंगलीपासून मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करतोय. पडेल ते काम मी केलेले आहे. चार वेळा नगरेसवक, चार वेळा स्थायी समितीचं अध्यक्षपद, तीन वेळा आमदार झालो. मात्र मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण वेगळं आहे. करोना काळात आपली काहीही कामं झालेली नाहीत. आरेतील 45 किलोमीटर रस्त्याच्या कामांसाठी मला 173 कोटी रुपये हवे आहेत. लोक रडत आहेत. आमच्याकडचे रस्ते होणे गरजेचे आहे, असे लोक सांगत आहेत. अशा वेळेला लोकांसाठी धोरणात्मक निर्णय होणं हे प्रामुख्याने गरजेचं असतं. असे निर्णय बदलले नाहीत तर आपण जनतेला न्याय देऊ शकत नाही” असे वायकर म्हणाले. Ravindra Waikar in Shinde Gat
“सत्तेत असल्याशिवाय धोरणात्मक निर्णय होऊ शकत नाहीत. लोक आपल्याला निवडून का देतात. लोकप्रतिनिधींनी सामान्यांच्या समस्यांवर काम करावे, असे लोकांचे मत असते. याच कारणामुळे निर्णय बदलणे हे गरजेचे आहे. देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. देशात ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे विधानसभेत वेगवेगळे निर्णय तातडीने घेत आहेत. माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी आज शिंदेंच्या शिवसेनेत आलो आहे. हे प्रश्न सुटले नाहीत तर मी लोकांमध्ये जाऊ शकत नाही,” असे वायकर यांनी स्पष्ट केले. Ravindra Waikar in Shinde Gat

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
उबाठा गटाचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी आज माझ्या वर्षा या निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मनीषा वायकर तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत केले. Ravindra Waikar in Shinde Gat

सच्चे शिवसैनिक, जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार, मुंबई महानगरपालिकेचे चार वेळा स्थायी समिती सभापती असलेले रवींद्र वायकर यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल आनंद होत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. Ravindra Waikar in Shinde Gat

गेल्या अडीच वर्षात राज्यात असलेल्या सरकारने अनेक आमदार, खासदारांची कामे प्रलंबित ठेवल्याने त्यांना काम करणाऱ्या सरकारमध्ये प्रवेश करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विभागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी जे निर्णय घ्यावे लागतील ते नक्की घेतले जातील असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिका, त्यानंतर विधानसभा आणि पक्षाचे काम करण्याचा देखील वायकर यांना प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाचा शिवसेनेला नक्की उपयोग होईल असे यावेळी सांगितले. Ravindra Waikar in Shinde Gat

याप्रसंगी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक कमलेश राय, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे संघटक उदय सावंत तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. Ravindra Waikar in Shinde Gat

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0