मुंबईक्राईम न्यूज

Mira Road Crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक हमला करणा-या आरोपींना न्यायालयाने सुनावली शिक्षा

•पोक्सो कायदा कलम 8,12 मधील दोन आरोपींना 05 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार दंड व दंड न भरल्यास 01 महिना साधा कारावास अशी शिक्षा तर दुसऱ्या आरोपीला 08 महिने साधा कारावास 5 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नयानगर पोलीस ठाणे गुन्हा भा.दं.वि.सं.कलम 376,354 अ, पोक्सो कायदा कलम 8,12 मधील आरोपी नामे 1) डेनिस थॉमस लुईस (63 वर्ष) मिरारोड पूर्व 2) जेणेविया अनिल मथाईस (32 वर्षे) यांना पहिला आरोपीला 14 डिसेंबर 2011 रोजी , तर दुसऱ्या आरोपीला 21 डिसेंबर 2019 रोजी वा अटक करण्यात आली होती. Mira Road Crime News

गुन्हयातील आरोपी क्र. 01 हा अटक केल्यापासुन जेलमध्ये होता. केसची सुनावणी दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी यातील आरोपी‌ क्र.01 यास दोषी ठरवुन त्यास 05 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार दंड व दंड न भरल्यास 01 महिना साधा कारावास अशी शिक्षा तर आरोपी क्र.02 हिस 08 महिने साधा कारावास 5 हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. Mira Road Crime News

केसचा तपास पोलीस निरीक्षक कैलास बर्वे तात्कालिन नेमणुक नयानगर पोलीस ठाणे यांनी केला असुन सदर केसच्या सुनावणी दरम्यान सरकारी अभियोक्ता संध्या म्हात्रे व विवेक कडु यांनी कामकाज पाहिले. केस चालु असताना प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – 01, राजेंद्र मोकाशी सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग, विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. Mira Road Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0