मुंबई

Traffic Issue : वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन

खासदार राजेंद्र गावीत, पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा काशिमीरा, वसई विरार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, मिरा भाईंदर व वसई विरार महानगरपालिकेचे प्रतिनीधी, उपस्थित Traffic Issue

मिरा रोड :- राष्ट्रीय महामार्ग 48 वरील होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत काल (29 फेब्रुवारी ) रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीकरीता खासदार राजेंद्र गावीत, पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा काशिमीरा, वसई च विरार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, मिरा भाईंदर व वसई विरार माहनगरपालिकेचे प्रतिनीधी, आरटीओ अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महामार्गाचे काम करणारे ठेकेदार तसेच मिरा भाईंदर व वसई विरार आयुक्तालयातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. Traffic Issue

बैठकीमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले

  1. राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाचे व्हाईट टोपिंगचे काम करणा-या कंत्राटदाराला पोलीस निरीक्षक, वसई वाहतूक विभाग यांनी सुचविलेल्या ठिकाणी मजबूत बॅरीकेटींग करुन घ्यावे. Traffic Issue
  2. महामार्गवरील सर्विस रोडवरील खड्डे प्राधान्याने दुरूस्त करणे, बेकायदा पार्किंग केलेली वाहने हटविणे व महामार्ग प्राधिकरणाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविणे इत्यादी कार्यवाही एन. एच. ए.आय. च्या अधिकाऱ्यांनी त्वरीत सुरू करावी.
  3. महामार्गावरील खानीवडे टोलनाका ते घोडबंदर या वाहिनीवर व्हाईट टोपिंगचे काम सुरू असतांना वाहतुकीचे नियोजन करण्याकरीता सुमारे 120 वार्डन भारतीय एन.एच.ए.आय. यांचे कंत्राटदार यांनी वाहतुक पोलीसांच्या सूचनेप्रमाणे कर्तव्यावर नेमावे. Traffic Issue
  4. महामार्गावरील काम एकाच वेळी अनेक ठिकाणी सुरु न करता एक किंवा दोन ठिकाणी कामे पूर्ण करुन त्यानंतर सलग काम करण्याबाबत एन.एच.ए. आय.च्या अधिकाऱ्यांनी सूचना दयाव्यात.
  5. महामार्गावरील डेब्रिज इतरत्र हलविण्याकरीता सबंधित महानगरपालिका क्षेत्रामध्ये जागा महानगरपालीका आयुक्तांनी उपलब्ध करुन दयावी व महामार्ग प्राधिकरणाने त्वरीत महामार्गावरील संबंधित ठिकाणी हलवावे.
  6. महामार्गावरील ब्लॅक स्पॉट च्या ठिकणी ओव्हर ब्रिज किंवा अंडर पास बनविण्याबाचत तसेच त्याबाचत अन्य उपाययोजना करणेबाबत सुचना करण्यात आल्या. Traffic Issue
  7. एन.एच.ए.आय. ने त्यांचे कंत्राटदार कडून महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी दुभाजकास नव्याने कट करण्यात आले आहेत ते ते कट कायमस्वरुपी बंद करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच आवश्यक ठिकाणी बॅरिकेटिंग करण्याबाबतच्या सुचना दिल्या. Traffic Issue

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0