सामाजिक

LPG GAS Agency : गॅस एजन्सीची अशी ही बनवाबनवी ! घरपोच सिलिंडर सेवेच्या नावाखाली बेकायदेशीर वसूली

दौंड, ता. तालुक्यात ग्राहकांकडून घरपोच सिलिंडरचे पैसे घ्यायचे. माञ सिलिंडर द्यायचे रस्त्यावरच, असा ग्रामीण भागातील गावांमध्ये काही गॅस एजन्सींचा खाक्या बनला आहे. त्यामुळे ग्राहकांना ज्यादा पैसे मोजूनही सिलिंडर उचलून घरी न्यावा लागत आहे. LPG GAS Agency
ग्रामीण भागातील परिसरात विविध गॅस एजन्सीच्या गाड्या येतात. ग्राहकांनी तेथे नोंदणी केल्यावर एजन्सीच्या गाड्या त्या-त्या भागात जातात. माञ, ग्राहकांना घरपोच सिलिंडर देण्याऐवजी ग्राहकांना सिलिंडर घेऊन रस्त्यावर चौकात रांग लावून उन्हात थांबावे लागते. सिलिंडर आणणारा गाडीचालक मनमानी पद्धतीने वेळी अवेळी गाडी घेऊन येत असल्याने ग्राहकांना अनेक तास उभे राहावे लागत आहे.ग्राहकास सिलिंडर मिळाल्यावर त्याला ते स्वतः उचलून दोन ते तीन किलोमीटर पायी न्यावे लागते. अनेकदा सिलिंडर घरी नेणाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश जास्त दिसून येत आहेत. तरीही गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना त्याची पर्वा नसते. या सर्व मनमानीला ग्राहक कंटाळले आहेत. या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना असाच ञास सहन करावा लागतो. याकडे जिल्हा प्रशासन विभागाच्या व गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून संबंधित एजन्सी चालकांवर कारवाई करावी व सिलिंडर थेट दारात मिळावे अशी ग्राहकांची मागणी आहे. गॅस एजन्सीचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. LPG GAS Agency

पैसे जास्त घेत असल्यास तक्रार कोठे कराल ?

  • भारत गॅस १८००२२४३४४
  • इंडेन गॅस – १८००२३३३५५५
  • – हिंदुस्तान पेट्रोलियम
    ( एचपी )
  • १८००२३३३५५५ ]

चौकट – सध्या मोठ्या प्रमाणात महागाईने सर्वसामान्यांना हैराण केले आहे. त्यात भर म्हणजे रोजच लागणाऱ्या गॅस सिलिंडरची. या सिलिंडरच्या पावतीवर नमूद केलेल्या रकमेपेक्षा तीस ते चाळीस रुपये जास्तीचे घेतले जात आहेत. जास्तीची रक्कम देण्यास नकार दिला तर पुन्हा सिलिंडर देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे आमच्याकडे जास्त रक्कम देण्या व्यतिरिक्त पर्याय नाही. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी ही विनंती. LPG GAS Agency

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0