मुंबई

Shinde Gat News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी नेत्यांचा प्रवेश

•मुंबई महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना तालुका प्रमुख यांचा प्रवेश

मुंबई :- राज्यात अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशना चालू असून लोकसभा 2024 च्या निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होतील. सध्या सर्व पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीकरिता कंबर कसली आहे. जो तो पक्ष बांधणी करिता मोठ्या प्रमाणावर‌ इतर पक्षांना सुरंग लावत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह अनेक पदाधिकारी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून कोकणातील सावंतवाडी तालुक्याचे‌ युवा सेना तालुकाप्रमुख यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. Shinde Gat News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सावंतवाडी तालुक्याचे युवासेना शहर प्रमुख योगेश नाईक ,गुणाजी गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. Shinde Gat News

मुंबई महानरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, शहाना रिजवान खान, शाबिया इकबाल शेख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काल #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यांच्यासह मेघवाल समाजाचे रविकुमार धाडिया व किशोर कुमार यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. Shinde Gat News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की
शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या मुंबईतील माजी नगरसेवकांचा आकडा हा रोजच वाढत आहे. शिवसेना आणि मेघवाल समाजाचे नाते हे जुनेच असून मुंबईसह ठाण्यातही मेघवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे.शिवसेनेमध्ये सर्व जाती, धर्माचे लोक आहेत. शिवसेना हा पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करतो. Shinde Gat News

मुंबई मध्ये सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. लोकांचा पैसा वाया जात नाही आहे, रस्ते सुधारत आहे, सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. Shinde Gat News

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेसकोर्सवर 120 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क उभारण्यात येणार आहे. अर्बन फॉरेस्ट, वृक्षारोपणाच्या माध्यमातून तसेच डीप क्लीन ड्राईव्ह या स्वच्छता अभियानातून प्रदूषण कमी झाले आहे तसेच हवेचा दर्जा सुधारला आहे.मेघवाल समाजाचा घर भाड्याचा विषय लवकरच पूर्णत्वास नेऊ, तसेच सफाई कामगारांच्या मुलांचा परदेशातील शिक्षणासाठी लागणारा खर्च हा महानगरपालिका करणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना विमा देण्यासाठी कामही सुरू असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना पक्षाचे खासदार मिलिंद देवरा उपस्थित होते. Shinde Gat News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0