पुणेसामाजिक
Trending

Handewadi Light Cut News : हांडेवाडी परिसरात विजेचा लपंडाव, त्रस्त नागरिकांची प्रशासनापुढे टाहो

Pune Mahavitaran Handewadi Light Cut News : त्रस्त नागरिकांनी महावितरण प्रशासनाला दिले निवेदन, 600 कुटुंबाला त्रास

पुणे :- हिंडेवाडी स्थित मॅजेस्टिक रिदम काउंटि विंग ए-3 आणि ए-4 येथील तब्बल सहाशे कुटुंबियांना अपुऱ्या वीजपुरवठामुळे नाहक त्रासाला सहन करावे लागत आहे. Handewadi Light Cut News

वारंवार विजेचा लपंडाव होत असल्याने त्रस्त झालेल्या सोसायटीच्या नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांना (Mahavitaran Officers) निवेदन देऊन विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

रिदम काऊंटी येथील रहिवाश्यांनी निवेदनात म्हटले आहे की, आम्ही रहीवासी आपल्या निदर्शनास आणू इच्छितों की मागच्या काही महिन्या पासून प्रत्येक दिवशी विद्युत पुरवठा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने खंडित (Light Cut) केला जातो. ही असुविधा बऱ्याच महिन्यापासून आम्ही रहिवासी भोगत आहोत. या संदर्भात फोन वरून बऱ्याच तक्रारी आमच्या भागातून गेल्या नंतर गुरुवारी (16 मे) रोजी सकाळीपासून दुपारी 3.30 पर्यंत त्याच्या मेंटेनन्स आणि दुरुस्ती कारणा साठी विद्युत पुरवठा खंडित केला होता. परंतु त्याचे कोणतेच समाधान कारक परिणाम सध्या दिसत नाहीत. मध्यंतरी व्होल्टेज चढ उतार होण्याची तक्रार सुद्धा नोंदवली ती काही अशी दुरुस्त केली पण सध्या ती पुन्हा काही वेळाने उदभवत आहे.सोसायटी मध्ये सगळ्या विंग मिळून ६०० हुन जास्त फ्लॅट्स आहेत. तसेच सोसायटी च्या बाहेरील भागात अनेक सोसायटी व वयक्तिक अपार्टमेंट्स असून सर्वांना या खंडित विद्युत पुरवठ्या चा त्रास होत आहे. या सतत व अचानक खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्या मुळे महागड्या घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे व महिला, बालक वृद्ध यांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. Pune Mahavitaran Handewadi Light Cut News


सोसायटीचे सदस्य सागर ऐनापुरे, आशिष इंगळे, उर्वेश दवे, नीरज झुरमुरे, सोहा खान, हसमुख सोनी, सोमेन चक्रवर्ती, स्नेहल राऊत यांच्यामार्फत सहाय्यक अभियंता बंडापल्ली यांचे सहाय्यक यांना निवेदन देऊन आपली समस्या सांगितल्या. Pune Mahavitaran Handewadi Light Cut News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0