Navi Mumbai OBC Adhiveshan : ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे अधिवेशन 11 ऑगस्ट रोजी

Navi Mumbai OBC Adhiveshan : नवी मुंबई येथील एमटीडीसी सभागृह खारघर येथे होणार ; केंद्रीय कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत घोषणा
मुंबई : ओबीसी अधिकारी कर्मचारी OBC Adhiveshan संघाचे यावर्षीचे अधिवेशन ११ऑगस्ट रोजी नवी मुंबई येथील एमडीटीसी सभागृह खारघर येथे आयोजित करण्याचा निर्णय संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, मुंबई विभागीय अध्यक्ष महादेव मिरगे, महासचिव राम वाडीभष्मे, कोकण विभागीय अध्यक्ष विजय केसरकर प्रमुख उपस्थित होते. या बैठकीमध्ये केंद्र व राज्यातील विविध प्रश्न, ठराव आणि भविष्यातील आंदोलनाची दिशा आदी नियोजनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. सोबतच जिल्हा पातळीवर राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना सुनील शेळके म्हणाले की, संख्येने मोठा असलेला ओबीसी समाज अजूनही अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. संघटनेच्यावतीने समाजातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत जाण्याचे लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक समस्यांवर ही संघटना सक्रियतेने काम करीत असून वेळोवेळी कामाचा संबंधित स्तरावर पाठपुरावा करून समाजाला न्याय मिळवून देण्यात कटिबद्ध आहे. Navi Mumbai OBC Adhiveshan
यावेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष विजय राठोड, कार्याध्यक्ष चंद्रकांत फुटके, बुलडाणा जिल्हाध्यक्ष किशोर पवार, धुळे जिल्हा सचिव मुरलीधर नानकर, सोलापूर येथील टी. लोहार, औदुंबर सुतार, नवी मुंबई येथील रवींद्र टेकाडे, वाशिम जिल्हा प्रभारी केश गिऱ्हे, जिल्हाध्यक्ष संभाजी साळसुंदर, यवतमाळ जिल्हाध्यक्ष शशिकांत लोळगे, सातारा जिल्हाध्यक्ष भानुदास वासके, जालना जिल्हा प्रभारी आकाश मेहत्रे, परभणी जिल्हाध्यक्ष राम भुरे आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
- 7 ऑगस्ट रोजी मंडल दिवस राज्यभरात साजरा करा
- ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुनील शेळके यांचे आवाहन
हजारो वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागास असलेल्या वर्गासाठी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा 7 ऑगस्ट 1990 रोजी संसदेत केली, त्यानंतर ओबीसींना शिक्षण, नोकरीत आरक्षण लागू झाले. खऱ्याअर्थाने याच दिवसापांसून ओबीसींना संविधानिक हक्क मिळायली सुरुवात झाली. त्यामुळे या दिवसाची आठवण व आंदोलनात अमूल्य योगदान दिलेल्यांच्या आठवणीला उजाळा देण्याचा हा दिवस आहे. याकरिता 7 ऑगस्ट हा दिवस सर्व ओबीसींनी मंडल दिवस म्हणून उत्सवात साजरा करावा, असे आवाहन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुनील शेळके यांनी केले आहे. Navi Mumbai OBC Adhiveshan