Pm Narendra Modi Kolhapur Sabha Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकाने, धैर्यशील माने यांच्या साठी प्रचारसभा
Pm Narendra Modi Kolhapur Sabha Updates Dhairyashil Mane Sanjay Mandalik : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी चार वाजता कोल्हापुरात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, संजय मंडलिक यांच्यासाठी जाहीर सभा घेणार
कोल्हापूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांची आज कोल्हापूरमध्ये Kolhapur Lok Sabha जाहीर सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक Sanjay Mandalik आणि धैर्यशील माने Dhairyashil Mane यांच्यासाठी ही सभा होत असून या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरमध्ये PM Modi Live Sabha In Kolhapur दाखल होणार आहेत. त्यानंतर तपोवन मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. Maharashtra Lok Sabha Election News Live
दरम्यान तिसऱ्या टप्यातील मतदानाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येणार असून दुपारी 4 वाजता कोल्हापूरमध्ये मोदींची जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूरनंतर मोदी गोव्यातही जाहीर सभा घेणार आहेत. Maharashtra Lok Sabha Election News Live
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 14 उमेदवारांसाठी अवघ्या चार दिवसांत नऊ जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, लातूर, बीड आणि नगर जिल्ह्यांत या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 29 आणि 30 एप्रिल या दोन दिवशी प्रत्येकी तीन अशा सहा प्रचार सभा होणार आहेत. यात 29 एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर शहरात पहिली सभा होईल. त्यानंतर कराडमध्ये दुपारी एक वाजता दुसरी सभा होईल. संध्याकाळी सहा वाजता पुण्यामध्ये तिसरी सभा होणार आहे. पुण्यातील सभेनंतर पंतप्रधान मोदी पुण्यातच मुक्कामी थांबणार आहेत. राजभवन येथे मोदींचा मुक्कामी असेल. दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता माळशिरस येथे पहिली सभा होईल. त्यानतंर लातूरमध्ये दुपारी एक वाजता सभा होणार आहे असून मोदींची राज्यातील शेवटची सभा धाराशिव येथे चार वाजता होईल. Maharashtra Lok Sabha Election News Live